Join us

कलाविश्वापासून दूर आहे अमेय वाघची पत्नी; दिसते खूपच सालस, पाहा तिचे निवडक photos

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 10:28 AM

1 / 10
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे अमेय वाघ.
2 / 10
'फास्टर फेणे', 'मुरांबा','धुरळा' अशा अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार अमेय सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं.
3 / 10
अमेय वाघला प्रेक्षक दररोज रुपेरी पडद्यावर पाहात असतात. परंतु, त्याची सहचारिणी म्हणजेच त्याची पत्नी कशी दिसते, ती काय करते याविषयी प्रेक्षकांना कायमच उत्सुकता असते.
4 / 10
अमेय जरी सोशल मीडियावर सक्रीय असला तरीदेखील त्याची पत्नी सोशल मीडियावर फारशी अॅक्टीव्ह नसल्याचं पाहायला मिळतं.
5 / 10
अमेयच्या पत्नीचं नाव साजिरी देशपांडे असं असून ती कलाविश्वापासून दूर आहे.
6 / 10
अमेय आणि साजिरी यांचं लव्ह मॅरेज असल्याचं सांगण्यात येतं. जवळपास १३ वर्ष हे दोघं एकमेकांचे चांगले मित्र होते. त्यानंतर या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं आणि त्यांनी कुटुंबाच्या संमतीने लग्नगाठ बांधली.
7 / 10
अमेय सोशल मीडियावर कायमच पत्नी साजिरीसोबत फोटो शेअर करत असतो.
8 / 10
अमेय अनेकदा साजिरीसोबत त्याचे काही खास फोटो शेअर करत असतो. हा फोटो शेअर करत त्याने साजिरीला मांजरी प्रचंड आवडतात असं त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.
9 / 10
साजिरी आणि अमेय यांचा एक सुंदर फोटो
10 / 10
साजिरी दिसायला प्रचंड सुंदर असून अत्यंत शांत स्वभावाची असल्याचं तिच्या फोटोतून दिसून येतं.
टॅग्स :अमेय वाघसिनेमासेलिब्रिटी