Join us

कलाविश्वापासून दूर आहे आरोह वेलणकरची पत्नी; स्टाइलच्या बाबतीत भल्याभल्या अभिनेत्रींवर करते मात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 7:00 AM

1 / 9
'बिग बॉस मराठी', 'लाडाची मी लेक गं' अशा कितीतरी मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता म्हणजे आरोह वेलणकर.
2 / 9
आरोह कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही कमालीचा सक्रीय आहे. त्यामुळे समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर तो व्यक्त होत असतो.
3 / 9
पुण्यातील मध्यमवर्गीय कुटुंबात आरोहचा जन्म झाला. येथेच तो लहानाचा मोठा झाला.
4 / 9
आरोहने पुण्यातील MIT college of engg Pune मधून त्याची इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली. विशेष म्हणजे येथेच त्याला त्याची जोडीदार सापडला.
5 / 9
कायम अभिनयामुळे चर्चेत येणारा आरोह यावेळी त्याच्या पत्नीमुळे चर्चेत आला आहे.
6 / 9
रेगे चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या आरोहचं लव्ह मॅरेज आहे. आरोहने अंकिता शिंघवी हिच्यासोबत लग्न केलं आहे.
7 / 9
अंकिता कलाविश्वात सक्रीय नसली तरीदेखील तिच्या सौंदर्यामुळे आज तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो.
8 / 9
आरोह वरचेवर अंकितासोबतचे फोटो शेअर करत असतो. यात बऱ्याचदा त्याच्या लहान बाळाचे फोटोही तो शेअर करतो.
9 / 9
अंकिताला नृत्याची विशेष आवड असल्याचं म्हटलं जातं.
टॅग्स :आरोह वेलणकरसेलिब्रिटीसिनेमाटेलिव्हिजन