Join us  

वीणेचा नाद, चिपळ्यांची साथ! वारकऱ्याच्या वेशातील 'या' मराठी अभिनेत्याला ओळखलं का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2024 5:00 PM

1 / 7
सध्या वारकरी विठुनामाच्या गजरात आणि वारीमध्ये दंग आहेत. त्यांना विठुरखुमाईच्या दर्शनाची आस लागली आहे. अनेक कलाकारही आषाढी एकादशीच्या वारीत सहभागी होताना दिसतात.
2 / 7
सध्या एका अभिनेत्याचे वारकरी वेशातील फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये अभिनेत्याने वारकऱ्यांसारखा पेहराव करून हातात वीणा आणि चिपळ्या घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
3 / 7
हातात वीणा आणि चिपळ्या घेऊन वारकरी वेश केलेल्या या अभिनेत्याला ओळखणंदेखील कठीण झालं आहे.
4 / 7
हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून क्षितीश दाते आहे. क्षितीश सध्या झी टॉकीजवरील वारी विशेष या कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
5 / 7
या कार्यक्रमातीलच त्याचा हा नवीन लूक आहे. इन्स्टाग्रामवरुन त्याने याचे फोटो शेअर केले आहेत.
6 / 7
क्षितीशने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'सरसेनापती हंबीरराव', 'मुळशी पॅटर्न',' धर्मवीर', 'चौक' या सिनेमांमध्ये तो झळकला आहे.
7 / 7
'धर्मवीर'मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भूमिका साकारून क्षितीश प्रसिद्धीझोतात आला होता. त्याने साकारलेली लोकमान्य टिळकांची भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.
टॅग्स :मराठी अभिनेताटिव्ही कलाकारवारकरी