बॅंकेने राहतं घर जप्त केलं, डोक्यावर कर्ज; पत्नीसोबत जागेच्या शोधात फिरत होते महेश कोठारे अन्... By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 4:07 PM1 / 9मराठी सिनेसृष्टीतील एक नामवंत कुटुंब म्हणून कोठारे कुटुंबाची (mahesh and adinath Kothare Family) ओळख आहे. तर फक्त मराठीतच नव्हे तर हिंदी सिनेसृष्टीतही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. (फोटो इन्स्टाग्राम)2 / 9तर सद्य घडीला अनेक चित्रपट आणि मालिकांची निर्मिती ते करताना दिसतात. पण असेही कधी कठीण दिवस आले होते जेव्हा कोठारे कुटुंब हे कर्जाच्या ओझ्याखाली होतं.(फोटो इन्स्टाग्राम)3 / 9 एक वेळ तर अशी होती जेव्हा महेश कोठारे आपल्या पत्नीसोबत मुंबईत भाड्याने घर शोधत फिरत होते. खुद्द आदिनाथ कोठारेनेच (Adinath Kothare) नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा प्रसंग सांगितला आहे. (फोटो इन्स्टाग्राम)4 / 9आदिनाथने नुकतीच प्लॅनेट मराठीच्या पॉडकास्टवर हजेरी लावली होती. आदिनाथ या मुलाखती दरम्यान बोलताना म्हणाला, २००५ मध्ये आम्ही 'खबरदार' चित्रपट करत होतो. त्यावेळी खूप कर्जबाजारी झालं होतो. (फोटो इन्स्टाग्राम)5 / 9त्यांनी एक चित्रपट केलेला आणि तो चालला नाही. त्याचं कर्ज फेडलं जात नव्हतं आणि ते वाढतंच चाललेलं. कोल्हापूरमध्ये आम्ही शूटिंग करत असताना बॅंकेने आमचं मुंबईतलं राहतं घर जप्त केलं होते. त्यावेळी मी एमबीए करत होता.(फोटो इन्स्टाग्राम)6 / 9आई-बाबांनी मला या गोष्टीची झळ लागू दिली नाही. पण त्या परिस्थिती ही बाबांनी त्या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलंय. त्यानंतर आई-बाबा मला आणि आजी-आजोबांना घेऊन पुण्याला गेले. (फोटो इन्स्टाग्राम)7 / 9आम्हाला पुण्याचा घरात ठेवत ते स्वत: मुंबईला घेऊन भाड्याने राहायला जागा शोधत होते. असा काळ पण आम्ही पाहिला आहे.' (फोटो इन्स्टाग्राम)8 / 9आदिनाथ पुढे म्हणाला, '२००५ मध्ये हा खूप मोठा लो पॉईंट होता. सिनेमे करत करत वडिलांनी त्यांचं सगळं गमावलं. पण त्याच सिनेमांनी माझ्या वडिलांना सगळं परत केलं. (फोटो इन्स्टाग्राम)9 / 9२०११ ला त्यांनी मराठी सिनेसृष्टीतली सगळ्यात मोठी डील केली. त्यानंतर आमचं कर्ज फिटलं आणि आमचं घरही झालं.(फोटो इन्स्टाग्राम) आणखी वाचा Subscribe to Notifications