कलाविश्वातील वावर कमी करुन कुटुंब सांभाळतीये मकरंद अनासपुरेची पत्नी; गाजलेल्या सिनेमांमध्ये केलंय काम By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2022 11:34 AM1 / 11उत्तम अभिनयशैली आणि विनोदबुद्धीच्या जोरावर प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे मकरंद अनासपुरे.2 / 11गाढवाचं लग्न, वास्तव, दे धक्का, खुर्चीसम्राट अशा कितीतरी वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटात त्याने काम केलं आहे.3 / 11मकरंद अनासपुरेच्या फिल्मी करिअरविषयी जरी अनेकांना माहित असलं तरीदेखील त्याच्या पर्सनल लाइफविषयी जाणून घेण्याची चाहत्यांनी कमालीची उत्सुकता असते.4 / 11अभिनयासोबतच मकरंद अनासपुरे नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजसेवेचं कार्य करतो. त्यामुळे त्याच्या प्रोफेशनल लाइफविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे.5 / 11मकरंदच्या पत्नीचं नाव शिल्पा अनासपुरे आहे. त्यादेखील उत्तम अभिनेत्री आहेत.6 / 11शिल्पा अनासपुरे यांनी अनेक चित्रपट, नाटकांमध्ये काम केलं आहे. मात्र, आता त्यांचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे.7 / 11मकरंद आणि शिल्पा यांचं लव्हमॅरेज आहे. २००० साली 'जाऊ बाई जोरात' या नाटकाच्या दरम्यान त्या दोघांची भेट झाली होती. या भेटीचं प्रेमात रुपांतर झालं आणि त्यांनी लग्न केलं.8 / 11दोघांचे हे इंटरकास्ट मॅरेज आहे. परंतु, या लग्नासाठी दोघांच्याही घरातून परवानगी होती. त्यामुळे ३० नोव्हेंबर २००१ रोजी औरंगाबाद येथे दोघांचे पारंपरिक पद्धतीने त्यांनी लग्नगाठ बांधली.9 / 11लग्नानंतरही शिल्पाने काही चित्रपटांमध्ये काम केलं. यात ५ चित्रपटांमध्ये त्यांनी मकरंदसोबत स्क्रीन शेअर केली.10 / 11कापूस कोंड्याची गोष्ट, तुक्या तुकविला नाग्या नाचविला, सुंबरान, गोष्ट छोटी डोंगरा एवढी या चित्रपटांमध्ये या जोडीने एकत्र काम केलं.11 / 11मकरंद आणि शिल्पा अनासपुरे यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications