दगडूशिवाय प्राजूने केलं प्री-वेडिंग फोटोशूट; क्षितीजाचं Solo Pre-wedding फोटोशूट चर्चेत By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2024 10:43 AM1 / 9मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता प्रथमेश परब लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. प्रथमेश त्याच्या गर्लफ्रेंडसोबत क्षितीजासोबत लग्न करणार आहे.2 / 9प्रथमेशने त्याच्या प्रेमाची कबुली दिल्यापासून सोशल मीडियावर सातत्याने त्याची आणि क्षितीजाची चर्चा रंगली आहे. 3 / 9सध्या प्रथमेशपेक्षा नेटकरी क्षितीजाविषयी बोलत आहेत. नुकतंच तिने सोलो प्री-वेडिंग फोटोशूट केलं आहे.4 / 9साधारणपणे लग्न ठरल्यानंतर कपल्स त्यांचं प्री-वेडिंग फोटोशूट करतात. मात्र, क्षितीजाने तिच्या एकटीचं फोटोशूट केलं आहे.5 / 9सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या क्षितीजाने सुरेख असं फोटोशूट केलं असून तिने प्रथमेशला ते सरप्राइज म्हणून दिलं आहे.6 / 9क्षितीजाने हे फोटोशूट करत प्रथमेशला एक पत्र सुद्धा लिहिलं आहे. त्यांच्या प्रेमाच्या आठवणी तिने या पत्राच्या माध्यमातून पुन्हा जिवंत केल्या आहेत.7 / 9नदीच्या किनारी बसून क्षितीजाने हे फोटोशूट केलं असून तिची संकल्पना सगळ्यांना भलतीच आवडली आहे.8 / 9क्षितीजाने सोलो प्री-वेडिंग फोटोशूट केल्यामुळे तिची सध्या चर्चा होतीये.9 / 9क्षितीजाने कोणताही ग्लॅमरस लूक न करता अत्यंत सोज्वळ आणि साध्या लूकमध्ये हे फोटोशूट केलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications