वेड लागले प्रेमाचे! बायकोबरोबर रोमँटिक झाला परबांचा प्रथमेश, पाहा फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2024 3:35 PM1 / 7प्रथमेश परब हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. 'टाइमपास' या सिनेमाने त्याला ओळख मिळवून दिली. दगडूची भूमिका साकारून तो घराघरात पोहोचला. 2 / 7प्रथमेशचा चाहता वर्ग मोठा असून तो सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतो. नुकतंच प्रथमेशने पत्नी क्षितीजासह पावसात भिजत रोमँटिक फोटोशूट केलं आहे. 3 / 7याचे फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये प्रथमेश पत्नीबरोबर रोमँटिक झाल्याचं पाहायला मिळत आहे. 4 / 7'चित्रपटामध्ये, On screen अनुभवलेला पाऊस आणि real life मध्ये माझ्या real heroin सोबत अनुभवलेला पाऊस कमालीचा वेगळा आणि विलक्षण होता', असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे. 5 / 7प्रथमेश आणि क्षितीजाचे हे रोमँटिक फोटोशूट चाहत्यांच्याही पसंतीस उतरलं आहे. या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव त्यांनी केला आहे. 6 / 7प्रथमेशने सोशल मीडियावरच त्याच्या प्रेमाची कबुली दिली होती. फेब्रुवारी महिन्यात लग्नगाठ बांधत त्यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. 7 / 7प्रथमेश आणि क्षितीजा सोशल मीडियावर पोस्ट करत एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त करताना दिसतात. आणखी वाचा Subscribe to Notifications