1 / 10सिनेइंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांचे स्वत:चे व्यवसाय आहेत. पण, नवऱ्याशी भांडण झालं आणि मराठी अभिनेत्याच्या पत्नीने बिजनेसवुमन व्हायचं ठरवलं. 2 / 10ही बिजनेसवुमन म्हणजे अभिनेता सिद्धार्थ जाधवची पत्नी तृप्ती अक्कलवार. तृप्तीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याबाबत सांगितलं. 3 / 10लॉकडाऊनमध्ये सिद्धार्थ आणि तृप्तीमध्ये भांडण झालं होतं. या भांडणामध्ये सिद्धार्थ तृप्तीला 'तुला कोण ओळखतं? तुला सगळे माझ्यामुळे ओळखतात. तुझी काय आयडेंटिटी आहे?', असं म्हणाला. 4 / 10सिद्धार्थचं हे बोलणं तृप्तीच्या जिव्हारी लागलं आणि मग तिने स्वत:ची ओळख निर्माण करायची असं ठरवलं. एका मैत्रिणीला सोबत घेऊन तृप्तीने स्वत:चा स्टार्टअप सुरू केला. 5 / 10 यासाठी तृप्तीने ५० लाखांचं कर्ज घेतलं होतं. पण, स्वत:ला सिद्ध करायचं असल्याने तृप्तीने सिद्धार्थकडून एकही रुपया घेतला नाही. 6 / 10तिने मित्रमैत्रिणी आणि ओळखीच्या लोकांकडून ७-८ टक्के व्याजावर पैसे घेतले. आणि स्वैरा एंटरप्राइजेस नावाने कंपनी सुरू केली. 7 / 10त्यात साड्यांचा ब्रँड सुरू केला. या कमाईतून तिने आत्तापर्यंत जवळपास ९०% कर्ज फेडले आहे. 8 / 10या पैशांतूनच तिने आता होम स्टेच्या उद्देशाने नागावमध्ये व्हिला खरेदी केला आहे. आता तृप्ती तिची ओळख तृप्ती सिद्धार्थ जाधव म्हणून नाही तर तृप्ती अक्कलवार म्हणून सांगते. 9 / 10सिद्धार्थ आणि तृप्तीने २००७ साली लग्न करत संसार थाटला. त्यांना स्वरा आणि ईरा या दोन मुली आहेत. 10 / 10मुलींच्या नावावरुनच तृप्तीने स्वैरा ही कंपनी सुरू केली आहे.