1 / 10अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर म्हणजेच गेल्या 3 मे रोजी विराजस कुलकर्णी व शिवानी रांगोळे यांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या. लग्न शाही होतं आणि रिसेप्शनही तितकंच शाही होतं. (Pics : @weddingkraft)2 / 10नुकतंच विराजस व शिवानीचं लग्नाचं रिसेप्शन पार पडला. या लग्नाच्या रिसेप्शनचे नवे फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये दिसतेय ते फक्त आणि फक्त विराजस व शिवानी.3 / 10मोठ्या थाटामाटात दोघांचं रिसेप्शन पार पडलं. या रिसेप्शनचा थाट बघण्यासारखा होता. विराजस व शिवानी स्टेजवर आले तेव्हा सगळ्यांच्या नजरा या पॉवर कपलवर खिळल्या होत्या.4 / 10शिवानीने रिसेप्शनमध्ये गुलाबी कलरचा हेवी वर्क असलेला लेहेंगा घातला होता. तर विराजसने तिच्या याच आऊटफिटशी मॅचिंग शेरवानी घातली होती. शिवानीचा लेहेंगा वजनानं चांगलाच जड होता. पण म्हणून उत्साह कमी नव्हता. 5 / 10दोघांचीही झक्कास एन्ट्री झाली आणि मग हे रिसेप्शनमध्ये हे कपल भाव खाऊन गेलं. कधी एकमेकांत हरवलं तर कधी आनंदाने बेभान झालं.विराजस व शिवानीच्या रिसेप्शनमध्ये अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. 6 / 10विराजस व शिवानी दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये होतं. आपलं नातं त्यांनी कधीच जगापासून लपवून ठेवलं नाही. एका नाटकाच्या सेटवर या लव्हस्टोरीची सुरूवात झाली होती.7 / 10 ‘डावीकडून चौथी बिल्डिंग’ या विराजसच्या नाटकात शिवानीनं अभिनय केला होता. तेव्हाच त्यांची ओळख झाली. पुढे दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं.8 / 10 विराजसनं ‘होस्टेल डेज’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. विराजस फक्त अभिनेता नाही तर तो एक दिग्दर्शकही आहे.‘अनाथेमा’ या नाटकात त्यांनं अभिनयाबरोबर दिग्दर्शनाचीही जबाबदारी पेलली होती. 9 / 10 रमा माधव चित्रपटासाठी मृणाल कुलकर्णी यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होत. याशिवाय मिकी, डावीकडून चौथी बिल्डिंग, भंवर यासारख्या काही नाटकांचं लेखन आणि दिग्दर्शनही त्याने केलं आहे.10 / 10शिवानीबद्दल सांगायचं तर ‘बनमस्का’मालिकेमुळे शिवानी रांगोळे हे नाव घराघरांत पोहोचलं. त्यानंतर तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं. सांग तू आहेस ना,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरव गाथा या मालिकांमध्ये ती झळकली.