मराठमोळ्या या अभिनेत्यांनी घटस्फोटानंतर दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, पाहा कोण आहेत ते? By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 7:00 AM1 / 8सध्या मराठी सिनेइंडस्ट्रीत बरेच सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. पण असेही काही सेलिब्रिटी आहेत जे एकदा नाही तर दोनदा बोहल्यावर चढले आहेत. पाहुयात कोण आहेत हे अभिनेते. 2 / 8प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांचेही दोन लग्नं झाली आहेत. दीपा मेहता यांच्याशी त्यांचं पहिलं लग्न झालं होतं, मात्र काही कारणाने ते विभक्त झाले. त्यानंतर त्यांनी मेधा मांजरेकर यांच्याशी विवाह केला. 3 / 8नुकताच विवाहबद्ध झालेला हरीश दुधाडेने देखील दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. आधी त्याचं प्रणिता दुधाडे हिच्याशी लग्न झालं होतं. मात्र ते वेगळे झाले व नुकतंच त्याने समृध्दी निकम हिच्याशी दुसरा विवाह केला. 4 / 8अभिनेता स्वप्नील जोशीचेही दोन लग्नं झाली आहेत. २००५ साली त्याने अपर्णा जोशी हिच्याशी लग्न केले होतं. मात्र २००९ साली त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर २०११ साली त्याने लीना आरध्ये हिच्याशी विवाह केला. 5 / 8अभिनेता संग्राम समेळनही मागील वर्षीच दुसरं लग्न केलं. अभिनेत्री पल्लवी पाटीलशी त्याचा विवाह झाला होता. मात्र ते वेगळे झाले व संग्रामने श्रद्धा पाठक हिच्याशी विवाह केला. 6 / 8अभिनेता पियूष रानडेने २०१० साली शाल्मली तोळे सोबत लग्नं केलं होतं मात्र २०१४ साली ते वेगळे झाले. त्यानंतर २०१७ साली त्याने अभिनेत्री मयुरी वाघ सोबत विवाह केला मात्र आता ते ही वेगळे झाले आहेत. 7 / 8लग्नाची वाइफ वेडिंगची बायको आणि पिंकीचा विजय असो अशा मालिकांमध्ये झळकलेल्या विजय आदंळकरचे ही दोन लग्नं झाली आहेत. अभिनेत्री पूजा पुरंदरे सोबत २०१७ साली त्याचा विवाह झाला होता. पण त्यांचा घटस्फोट झाला तर २०२१ मध्ये त्याने त्याची सहकलाकार अभिनेत्री रुपाली झंकर हिच्याशी लग्न केले. नुकतेच दोघेही आईबाबा झालेत. 8 / 8अभिनेता शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान यांची जोडी अनेकांना माहीतच आहे. २०१४ साली दोघांनी अगदी थाटामाटात लग्न केले होते. मात्र अवघ्या वर्षभरातच ते वेगळे झाले. त्यानंतर २०१७ साली त्याने प्रियांका ढवळे हिच्याशी विवाह केला. आणखी वाचा Subscribe to Notifications