सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देतीये किशोरी गोडबोलेची लेक;पाहा तिचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 13:42 IST
1 / 9मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे किशोरी गोडबोले. ९० चं दशक गाजवून या अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं.2 / 9 'फुल थ्री धमाल', 'खबरदार', 'कोहराम' आणि 'वन रूम किचन' यांसारख्या कितीतरी सिनेमा, मालिकांमध्ये तिने काम केलं आहे.3 / 9किशोरीने मराठीसह हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. त्यामुळे आज तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचा पाहायला मिळतो.4 / 9सध्या किशोरीचा मराठी कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र, ती हिंदी मालिकांमध्ये आजही काम करताना दिसते. 5 / 9सध्या सोशल मीडियावर तिच्या लेकीची चर्चा रंगली आहे. तिच्याच पावलावर पाऊल ठेवत तिची लेक कलाविश्वात पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे.6 / 9किशोरीच्या लेकीचं नाव सई गोडबोले असं असून ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे.7 / 9सईने काही जाहिराती आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'फार मिलेंगे चलते चलते', 'इंतेजार' सारख्या चित्रपटात काम केलं आहे. 8 / 9सई अभिनेत्री असण्यासोबतच एक गायिकादेखील आहे. सई सोशल मीडियावर कायम तिच्या गाण्याचे व्हिडीओ शेअर करत असते.9 / 9सई लवकरच आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवत मराठी कलाविश्वात पदार्पण करणार आहे. 'तू मी आणि अमायरा', या नव्या कोऱ्या सिनेमातून ती मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे.