Join us  

मराठी अभिनेत्रीने शेअर केले स्विमिंगपूलमधील हॉट फोटो, म्हणते- "जगाचा विचार करत बसलो तर..."

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2024 2:02 PM

1 / 8
लावणीच्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणारी लावणीसम्राज्ञी म्हणजे मेघा घाडगे. नृत्यांगणा असण्याबरोबरच मेघा उत्तम अभिनेत्रीदेखील आहे.
2 / 8
अनेक सिनेमांमध्ये मेघाने काम केलं आहे. 'पछाडलेला', 'चल धर पकड', 'पोपट' अशा सिनेमांमधून तिने अभिनयाची चुणूक दाखवली.
3 / 8
मेघा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही ती चाहत्यांना देत असते.
4 / 8
नुकतेच मेघाने स्विमिंगपूलमधील तिचे काही हॉट फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
5 / 8
'लख लख उन्हाची! जगाचा विचार करीत बसलो तर स्वतःसाठी जगणार कधी?', असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
6 / 8
मेघाचे हे हॉट फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
7 / 8
'खुपच सुंदर स्माईल मॅडम', 'निळया पाण्यातील दिवस', 'Hotness overloaded' अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
8 / 8
दरम्यान, मेघाची अनेक लावणी गाणी सुपरहिट झाली आहेत. 'बिग बॉस मराठी'मध्येही मेघा सहभागी झाली होती.
टॅग्स :सेलिब्रिटीटिव्ही कलाकार