अशोक सराफ यांची पत्नी आहे यशस्वी बिझनेस वूमन; जाणून घ्या अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या व्यवसायाविषयी By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2022 4:34 PM1 / 10मराठी कलाविश्वातील नावाजलेलं नाव म्हणजे अभिनेत्री निवेदिता सराफ. 'नवरी मिळे नवऱ्याला', 'धुमधडाका', 'माझा छकुला', 'अशी ही बनवाबनवी' या आणि अशा असंख्य चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली.2 / 10अलिकडेच त्या 'अग्गंबाई सूनबाई' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. यात त्यांनी आसावरी ही भूमिका साकारली होती. 3 / 10निवेदिता सराफ यांनी जवळपास ३० वर्षांपेक्षा अधिक काळ कलाविश्वात काम केलं आहे. नाटक, चित्रपट, मालिका अशा विविध माध्यमातून त्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात.4 / 10विशेष म्हणजे निवेदिता सराफ या उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच यशस्वी उद्योजिकादेखील आहेत. 5 / 10निवेदिता सराफ यांचा स्वत:चा साड्यांचा ब्रँड असून गेल्या कित्येक वर्षांपासून त्या हा व्यवसाय करत आहेत.6 / 10'हंसगामिनी' असं निवेदिता यांच्या ब्रँडचं नाव असून त्या स्वत: यातील प्रत्येक साडी डिझाइन करतात.7 / 10साड्यांच्या किंमती जास्त असल्यामुळे अनेकांना इच्छा असूनही डिझायन साड्या खरेदी करता येत नाहीत. त्यामुळे कमीत कमी किंमतीमध्ये हंसगामिनी ग्राहकांना डिझायनर साड्या उपलब्ध करुन देतात.8 / 10सुरुवातीला त्यांनी अनेक ठिकाणी या साड्यांचं प्रदर्शन ठेवलं होतं. तसंच या व्यवसायातून अनेक गरजू महिलांना रोजगारांची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.9 / 10इन्स्टाग्राम, फेसबुक यासारख्या सोशल मीडियावर त्यांच्या हंसगामिनी या ब्रँडचं पेज असून त्यावर त्या त्यांच्या साड्यांचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात.10 / 10अनेक मराठी सेलिब्रिटीदेखील त्यांच्याकडून आवर्जुन साड्यांची खरेदी करतात. आणखी वाचा Subscribe to Notifications