Join us

बरसों रे मेघा...; पावसात भिजत पूजा सावंतचं फोटोशूट, साडीत दिसल्या मादक अदा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 12:01 PM

1 / 8
पूजा सावंत ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक सिनेमांमध्ये काम करून तिने कलाविश्वात तिची छाप पाडली.
2 / 8
पूजा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. तिने नुकतंच पावसात भिजत फोटोशूट केलं आहे. याचे फोटो पूजाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
3 / 8
या फोटोंमध्ये पूजाने निळ्या रंगाची साडी आणि त्यावर स्लीव्हलेस ब्लाऊज घातल्याचं पाहायला मिळत आहे. केस मोकळे सोडत अगदी साधा मेकअप केला आहे.
4 / 8
फोटोसाठी पूजाने विविध पोझ दिल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये पूजाच्या साडीतील मादक अदाही दिसत आहेत.
5 / 8
पूजाच्या या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
6 / 8
या फोटोला पूजाने 'वर्षाऋतू' असं कॅप्शन दिलं आहे. पूजाचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
7 / 8
पूजाने नुकतंच सिद्धेश चव्हाणशी लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. लग्नानंतर पूजा काही दिवस नवऱ्याबरोबर अमेरिकेला होती.
8 / 8
लग्नानंतर पूजा कामातून ब्रेक घेणार असल्याचं म्हणण्यात येत होतं. पण, काहीच दिवसांपूर्वी भारतात परतत तिने कामाला सुरुवात केली आहे.
टॅग्स :पूजा सावंतसेलिब्रिटी