"सहा महिन्यांपूर्वी मी आणि सिद्धेशने...", पूजा सावंतची पोस्ट, शेअर केले लग्नातील Unseen फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 11:20 AM1 / 9मराठी सिनेसृष्टीतील कलरफूल पूजा सावंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. पूजाने काही महिन्यांपूर्वीच लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. 2 / 9पूजाच्या लग्नाला सहा महिने पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने पूजाने लग्नातील काही Unseen फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. 3 / 9पूजा आणि सिद्धेश चव्हाणने २८ फेब्रुवारीला लग्नगाठ बांधली होती. पूजाच्या वैवाहिक जीवनाला ६ महिने पूर्ण झालेत. 4 / 9'सहा महिन्यांपूर्वी मी आणि सिद्धेशने या प्रवासाला सुरुवात केली होती. तेव्हापासून प्रत्येक दिवस हा उजळून निघाला आहे', असं पूजाने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 5 / 9पुढे ती म्हणते, 'तुम्ही दिलेलं प्रेम आणि आशीर्वाद यासाठी आम्ही आभारी आहोत'. 6 / 9पूजाने लग्नातील काही खास क्षणांचे फोटो शेअर करत ही पोस्ट केली आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 7 / 9पूजा आणि सिद्धेश यांनी काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. 8 / 9पूजाचा पती सिद्धेश चव्हाण हा कामानिमित्त ऑस्ट्रेलियाला असतो. लग्नानंतर पूजादेखील ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली आहे. 9 / 9लग्नानंतर अभिनेत्रीने कामातून काही काळ ब्रेक घेतला होता. मात्र काही दिवसांपूर्वीच ती कामानिमित्त भारतात आली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications