PICS : मायलेकीचा दुबई टूर!! प्राजक्ता माळीने शेअर केले आईसोबतचे झक्कास फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 02:09 PM 2022-03-13T14:09:51+5:30 2022-03-13T14:19:35+5:30
Prajakta Mali enjoys her vacation in Dubai : आईला बाहेर देशात फिरायला जायचं होतं... आम्ही दोघी दुबईला आलो... प्राजक्ता माळी आईसोबत घेतेय सुट्ट्यांचा आनंद सालस, सोज्वळ सून म्हणून झी मराठीवरील ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या कुठे आहे तर दुबईत.
होय, ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या शोमधून ब्रेक घेऊन प्राजक्ता माळी एका खास व्यक्तीसोबत दुबईत एन्जॉय करतेस.
ही खास व्यक्ती कोण तर प्राजूची आई. मायलेकी सध्या दुबईत आहेत आणि धम्माल मज्जा करत आहेत.
दुबईतील भटकंतीदरम्यानचे काही फोटो प्राजक्ताने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे टूरचे फोटो एकदम झक्कास आहेत.
महिला दिनाचं गिफ्ट म्हणून प्राजूने आईसाठी दुबईचा टूर बनवला आणि तो सक्सेसही केला. सध्या मायलेकी दुबईतील विविध स्थळांना भेट देत आहेत.
प्राजक्तानं 2011 साली ‘सुवासिनी’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. या मालिकेत तिनं सावित्री ही व्यक्तिरेखा साकारली होती.
त्यानंतर ती जुळून येती रेशिम गाठी, नकटीच्या लग्नाला यायचं हं या मालिकांमध्ये काम केलं. जुळून येती रेशीमगाठी या मालिकेत तिनं साकारलेल्या मेघा देसाई या व्यक्तिरेखेला प्रचंड लोकप्रियता मिळाली.
याच लोकप्रियतेच्या जोरावर तिला खो-खो, संघर्ष, हंपी, ...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्येही काम करण्याची संधी मिळाली.
सध्या ती महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी शोमध्ये होस्टच्या भूमिकेत झळकत आहे.
नुकतीच ती ‘पावनखिंड’ या सिनेमात झळकली. चित्रपटातील तिच्या या भुमिकेचंही चांगलंच कौतुक होतंय.
प्राजक्ता सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ती आपले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.