Join us  

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री गेली आई एकविरा देवीच्या दर्शनाला, म्हणते- "आगरी कोळ्यांची माऊली..."

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 4:38 PM

1 / 7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री रुचिरा जाधव सध्या चर्चेत आहे. रुचिरा बाबू या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या ती या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.
2 / 7
'बाबू' सिनेमाच्या टीमने नुकतंच आई एकविरा देवीचं दर्शन घेतलं. यावेळी रुचिरा जाधवही उपस्थित होती.
3 / 7
साडी नेसून पारंपरिक पेहराव करत रुचिरा एकविरा देवीच्या दर्शनाला गेली होती. याचे काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
4 / 7
'आई माऊलीचा उदो उदो…पहिला आगरी-कोळी चित्रपट “बाबू” आणि आगरी कोळ्यांची माऊली एकवीरा आई…आई, तुझा आशिर्वाद राहूदे गं माऊली...', असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.
5 / 7
रुचिराच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
6 / 7
रुचिराचा 'बाबू' सिनेमा येत्या २ ऑगस्टला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अभिनेता अंकित मोहन मुख्य भूमिकेत आहे. अस्सल आगरी कोळी भाषेतला हा पहिलाच मराठी सिनेमा आहे.
7 / 7
'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून अभिनेत्री रुचिरा जाधव घराघरात पोहोचली. 'बिग बॉस मराठी'मुळे ती चर्चेत आली होती. आता ती मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.
टॅग्स :टिव्ही कलाकारबिग बॉस मराठीसिनेमा