Join us  

Sai Tamhankar: सई ताम्हणकरने गोंदवलेल्या तारखांमागचा अर्थ काय? पहिल्या नवऱ्याशी खास कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2024 2:16 PM

1 / 8
मराठीबरोबरच हिंदी सिनेसृष्टी गाजवणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. अभिनयाबरोबरच सई तिच्या बोल्डनेस आणि फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते.
2 / 8
अनेकदा सई तिच्या बोल्ड फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेताना दिसते. या फोटोंमधील सईच्या खांद्यावर असलेल्या टॅटूचीदेखील बऱ्याचदा चर्चा रंगताना दिसते.
3 / 8
सईने खांद्यावर एक टॅटू गोंदवून घेतला आहे. या टॅटूमध्ये काही तारखा असल्याचं दिसत आहे. या टॅटूमागचं गुपित सईने एका मुलाखतीत सांगितलं होतं.
4 / 8
सईच्या खांद्यावरील हा टॅटूचं अभिनेत्रीच्या पहिल्या नवऱ्याशी कनेक्शन आहे. या टॅटूबद्दल सांगताना सई म्हणाली होती, 'या तारखांचा माझ्या नवऱ्याशी संबंध आहे. काही वर्षांपूर्वी या तारखा माझ्यासाठी स्पेशल होत्या'.
5 / 8
'पण या तारखा ज्याच्यासाठी गोंदविल्या होत्या. ती व्यक्तीच आयुष्यात राहिली नाही. त्यामुळे आता फक्त तारखा आणि आठवणी राहिल्या आहेत', असं ती म्हणाली होती.
6 / 8
२०१३ साली सईने व्यावसायिक अमेय गोसावी यांच्याशी लग्न केलं होतं. पण, अवघ्या दोनच वर्षांत त्यांचा संसार मोडला. २०१५ साली घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले.
7 / 8
सईच्या लग्नाची आणि घटस्फोटाचीदेखील खूप चर्चा रंगली होती. नवऱ्यापासून वेगळं होऊनही सईने या हा टॅटू तसाच ठेवला आहे.
8 / 8
अनेकदा सई तिच्या फोटोशूटमध्ये तिच्या उजव्या खांद्यावरील हा टॅटू फ्लॉन्ट करताना दिसते.
टॅग्स :सई ताम्हणकरसेलिब्रिटी