Join us  

सोनाली कुलकर्णीच्या खट्याळ अदा, करी जीवाला घायाळ...; पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 12:30 PM

1 / 6
मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा अर्थात सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. इन्स्टावरचे तिचे रोज नवे फोटो पाहून चाहते पुन्हा पुन्हा तिच्या प्रेमात पडतात.
2 / 6
आता सोनालीने इन्स्टाग्रामवर नवीन फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटोही दृष्ट लागावी इतके सुंदर आहेत.
3 / 6
लाल रंगाचा जंपसूट, मोकळे केस... तिचा हा अंदाज चाहत्यांना भलताच आवडला आहे. यात सोनाली वेगवेगळ्या पोज देताना दिसतेय.
4 / 6
सोनालीच्या या फोटोंवर चाहते भरभरून कमेंट्स देत आहेत. सुंदर, अप्रतिम अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
5 / 6
काही दिवसांपूर्वी सोनाली कुलकर्णीच्या ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. चित्रपटाचे पोस्टर देखील प्रदर्शित करण्यात आले. चित्रपटाच्यी चित्रीकरणास सुरुवात करण्यात आली आहे.
6 / 6
संजय जाधव दिग्दर्शित आणि सचित पाटील, सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त सोहळा नुकताच मुंबईत संपन्न झाला.
टॅग्स :सोनाली कुलकर्णी