मराठमोळ्या सोनाली खरेचा पती आहे ‘हा’ प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता, पाहा कपलचे रोमॅन्टिक फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 8:00 AM1 / 11मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली खरे. सोनालीचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र, ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. आता ती निर्मिती क्षेत्रात पदार्पण करतेय.2 / 11 सोनालीनं नुकतीच ब्लुमिंग लोटस प्रॉडक्शन हाऊसची घोषणा केली असून या अंतर्गत तिचा ‘मायलेक’ हा पहिला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं. 3 / 11सोनालीला सगळेच ओळखतात. पण तिचा पती हा सुद्धा एक लोकप्रिय अभिनेता आहे. हिंदी सिनेमातील तो लोकप्रिय अभिनेता. तो कोण तर बिजय जे आनंद4 / 111998 साली आलेला ‘प्यार तो होना ही था’ हा सिनेमा तुम्हाला आठवत असेलच आणि या सिनेमातील काजोलचा ‘मंगेतर’ ही आठवत असणार. हाच तो बिजय जे आनंद. या सिनेमात बिजय काजोलसोबत स्क्रिन शेअर करताना दिसला होता. 5 / 11सोनाली व बिजय जे आनंद पती-पत्नी आहेत. दोघांना एक मुलगी आहे.दोघांचंही लव्हमॅरेज आहे. ‘रात होने को है’ या मालिकेदरम्यान सोनाली व बिजय या दोघांचीही पहिली भेट झाली होती. तेथून त्यांच्या प्रेमालाही सुरुवात झाली होती.6 / 11 दोन-अडीच वर्षे रिलेशनशीपमध्ये होते. एकमेकांच्या आवडी- निवडी जाणून घेतल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. सोनाली आणि बिजय यांना एक मुलगी आहे तिचे नाव सानया आहे.7 / 11सोशल मीडियावर सोनाली आणि बिजय दोघांचेही एकत्र फोटो पाहायला मिळतात. दोघांमध्ये असलेली केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते. ‘प्यार तो होना ही था’ या सिनेमानंतर बिजय आनंदला अनेक चित्रपटाच्या ऑफर्स आल्यात. पण त्याने फार कमी सिनेमात काम केले. 8 / 11बिजय आनंदच्या आयुष्यात अनेक चढऊतार आलेत आणि यादरम्यान त्याने अभिनयाला रामराम ठोकण्याचा निर्णय त्याने घेतला. रिपोर्टनुसार, बिजय आनंदला वयाच्या 26 व्या वर्षी आर्थराइटिसने पीडित झाला होता.9 / 11या आजारानंतर बिजय आनंदने आपल्या आरोग्यावर लक्ष केंद्रीत आणि योगसाधना सुरु केली. पुढे तो यातच इतका रमला की, स्वत:चं योगा सेंटर सुरु केलं.10 / 111998 साली ‘औरत’ मालिकेत तो दिसला होता. त्यानंतर 2002 साली ‘रामायण’ या मालिकेत त्याने लक्ष्मणची भूमिका साकारली. त्यानंतर तब्बल सोळा वर्षे बॉलिवूड व टेलिव्हिजनमधून तो गायब झाला होता. आता तो पुन्हा अॅक्टिंगच्या दुनियेत अॅक्टिव्ह झाला आहे.11 / 11 सोनाली खरे हिने मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीत काम केलं आहे. आभाळमाया, बेधुंद मनाच्या लहरी, ऊन पाऊस, बे दुणे दहा या मालिका तसंच, तेरे लिए, सावरखेड-एक गाव, चेकमेट, अँड जरा हटके, हृदयांतर हे तिचे सिनेमा लोकप्रिय झाले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications