संगीतविश्व आणि वर्षा उसगांवकर यांच्या पतीचा आहे जवळचा संबंध; पाहा अभिनेत्रीच्या नवऱ्याची एक झलक By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 7:00 AM1 / 10मराठी कलाविश्वातील डॅशिंग आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगांवकर.2 / 10मराठी कलाविश्वातील एक काळ गाजवणाऱ्या या अभिनेत्रीची भुरळ आजही प्रेक्षकांवर कायम आहे.3 / 10सध्या वर्षा उसगांवकर सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर त्या कायम चर्चेत येत असतात.4 / 10यात सध्या त्यांच्या पतीची चर्चा रंगली आहे. वर्षा उसगांवकरांचे पती कोण?, ते काय करतात? हे जाणून घेण्याची नेटकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे.5 / 10वर्षा उसगांवकर यांच्या पतीचं नाव अजय शर्मा असं आहे. अजय हे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक रवीशंकर शर्मा यांचे पुत्र आहेत.6 / 10वर्षा आणि अजय यांच्या लग्नाला जवळपास १९-२० वर्ष झाली आहेत. अजय बऱ्याचदा वर्षा यांच्यासह फिल्मी पार्ट्यांमध्ये हजेरी लावतात.7 / 10अजय सोशल मीडियावर फारसे सक्रीय नाहीत. त्यामुळे त्यांचे अत्यंत मोजके फोटो पाहायला मिळतात.8 / 10एका कार्यक्रमात वर्षा उसगांवकर यांच्यासह उपस्थिती लावलेले अजय9 / 10वर्षा उसगांवकर यांनी मराठीसह हिंदी, राजस्थानी वा अन्य काही भाषिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.10 / 10१९८०-९० चा काळ वर्षा यांनी गाजवला. 'शेजारी शेजारी', 'पटली रे पटली', 'घनचक्कर', 'मुंबई ते मॉरिशस', 'मज्जाच मज्जा', 'हमाल दे धमाल', 'कुठं कुठं शोधू मी तिला', 'गंमत जंमत', 'खट्याळ सासू नाठाळ सून', 'सगळीकडे बोंबाबोंब', 'आमच्या सारखे आम्हीच', 'ऐकावं ते नवलच', 'एक होता विदूषक' अशा असंख्य हिट चित्रपटांमध्ये त्या झळकल्या. आणखी वाचा Subscribe to Notifications