Join us  

Navratri 2024 : प्रतिजाचं नवरात्रोत्सवानिमित्त खास फोटोशूट; पारंपरिक लूक ठरतोय लक्षवेधी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2024 5:55 PM

1 / 8
मराठमोळा अभिनेता प्रथमेश परब सध्या 'ताजा खबर या वेब सीरिजमुळे प्रसिद्धीझोतात आला आहे. अशातच अभिनेत्याने पत्नीसह नवरात्रोत्सव स्पेशल खास फोटोशूट केलं आहे.
2 / 8
हे जोडपं कायमच त्यांच्या हटके स्टाईलने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं.
3 / 8
सध्या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी पारंपरिक वेभूषेला प्राधान्य देत काही फोटोज क्लिक केले आहेत.
4 / 8
प्रथमेश-क्षितीजाचा हा अंदाज नेटकऱ्यांना भावला आहे.
5 / 8
आज नवरात्रीच्या सहाव्या दिवशी प्रथमेशने लाल रंगाचा कुर्ता तर क्षिताजाने नऊवारी नेसली आहे.
6 / 8
'तुझ संग बैर लगाया ऐसा, रहा ना मैं फिर अपने जैसा...' असं कॅप्शन देत अभिनेत्याने त्यांचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
7 / 8
'टाइमपास' सिनेमात मुख्य भूमिका साकारत प्रथमेशने अभिनयाची छाप पाडली. या सिनेमात त्याने साकारलेलं दगडू हे पात्र प्रेक्षकांच्या भलतंच पसंतीस उतरलं होतं.
8 / 8
सध्या प्रथमेश हिंदीतही आपल्या अभिनयाची जादू दाखवत आहे.
टॅग्स :प्रथमेश परबनवरात्रीसेलिब्रिटीसोशल मीडियाव्हायरल फोटोज्