नाकात कारवारी नथ, गळ्यात मोत्यांचे दागिने; हिरवी साडी नेसून गौरीने केली इंटरनेटवर हवा... By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 5:00 PM1 / 7'स्वप्नांच्या पलीकडले', 'सूर राहुदे' यांसारख्या मालिकांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवत गौरी नलावडे हे नाव महाराष्ट्रातील घराघरात पोहचलं. 2 / 7छोट्या पडद्यावरून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवत अभिनेत्रीने चाहत्यांची मनं जिंकली. 3 / 7मालिकाविश्व गाजवल्यानंतर गौरीने काही मराठी चित्रपटांमध्येही मुख्य भुमिका साकारल्या. 4 / 7'कान्हा', 'गोदावरी' या सिनेमांमध्ये काम करून तिने मराठी मनोरंजन विश्वात आपला दबदबा निर्माण केला.5 / 7अभिनेत्री गौरी नलावडे सोशल मीडियावर सक्रिय असून या माध्यमातून ती तिच्या आयुष्यातील अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करते. 6 / 7गुढीपाडव्याच्या निमित्ताने अभिनेत्रीने तिचे साडीतील काही खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंवर ''So pretty uff! '' अशी प्रतिक्रिया अभिनेत्री सई ताम्हणकरने दिली आहे. 7 / 7हिरवी साडी त्यावर स्लिव्हलेस ब्लाऊज तसेच नाकात घातलेली कारवारी नथ तिला अगदी शोभुन दिसते. शिवाय या पारंपरिक पेहरावावर परिधान केलेल्या मोत्यांच्या दागिन्यांनी गौरीच्या सौंदर्यात भर घातली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications