PHOTO: १५० वर्षांची परंपरा अन् उभ्या गौराई; सायली संजीवच्या मुंबईतल्या घरी झालं गौरीचं आगमन By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 5:07 PM1 / 8देशभरात गणेशाचे आगमन झाल्यानंतर सर्वत्र उत्साह, जल्लोषाने वातावरण भारावून गेले आहे. 2 / 8लाडक्या गणरायापाठोपाठ मंगळवारी सायंकाळी मुंबईत घराघरांमध्ये गौराईचं स्वागत करण्यात आलं.3 / 8सर्वसामान्यांसह कलाकार मंडळींही त्यांचे मोठ्या थाटामाटात स्वागत करताना दिसत आहेत. अशातच अभिनेत्री सायली संजीवच्या मुंबईतील घरी पहिल्यांदाच गौराईचं आगमन झाल्याचं पाहायला मिळतंय.4 / 8सायलीने स्वत: च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करत तिच्या घरातील गौराईची झलक दाखवली आहे.5 / 8१५० वर्षांची परंपरा असलेल्या उभ्या गौराई आणि बाप्पा यांचे फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केल्याचं पाहायला मिळतंय. 6 / 8सायलीने देखील गौराईच्या स्वागतासाठी कोणतीही कसर सोडलेली नाही. 7 / 8पिवळ्या रंगाची नऊवारी त्यावर पारंपरिक साज करत अभिनेत्री माहेरवाशीन गौराईच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. 8 / 8सायली संजीव मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मालिका, चित्रपटात विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications