Join us

PHOTO: दिसते चंद्राची कोर साजरी! हिरव्या रंगाच्या साडीत सोनाली कुलकर्णीचं झक्कास फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 2:15 PM

1 / 8
अभिनयाबरोबरच सोनाली तिच्या बिनधास्त आणि बेधडक स्वभावासाठीही ओळखली जाते
2 / 8
सोनाली कुलकर्णीने 'देऊळ', 'गुलाबजाम', 'अगं बाई अरेच्चा २', 'गारभीचा पाऊस', 'गुलमोहर' अशा अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे.
3 / 8
तसेच 'दिल चाहता है', 'सिंघम', 'कितने दूर कितने पास', 'अग्निवर्षा', या हिंदी सिनेमांमध्येही ती झळकली आहे.
4 / 8
सोनाली सोशल मीडियावर सक्रीय असते. त्याद्वारे तिचे नवनवीन प्रोजेक्ट्स तसेच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स यामार्फत ती चाहत्यांना देत असते.
5 / 8
नुकतेच इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फोटो पोस्ट केले आहेत.
6 / 8
हिरव्या रंगाची साडी, नाकात मोत्याची नथ तसेच केसात गजरा माळून सोनालीने शृंगार केला आहे.
7 / 8
'पिया तोसे...' असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
8 / 8
सोनाली कुलकर्णीचं हे सुंदर फोटोशूट पाहून त्यावर कलाकार मंडळींनीही कमेंट केल्याच्या पाहायला मिळत आहेत.
टॅग्स :सोनाली कुलकर्णीसेलिब्रिटीसोशल मीडियाव्हायरल फोटोज्