Join us

PHOTOS : ‘श्वास’ चित्रपटातील चिमुकला परशुराम आठवतो? आता करतोय हे काम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 5:38 PM

1 / 8
2004 साली प्रदर्शित झालेला ‘श्वास’ हा मराठी सिनेमा म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील एक सोनेरी पान. आजोबा आणि नातवाच्या नात्याभोवती गुंफलेल्या या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कार पटकावला होता. या चित्रपटातील परशुरामला तुम्ही नक्कीच विसरला नसाल.
2 / 8
होय, या चित्रपटात परशुराम या नातवाची भूमिका बालकलाकार अश्विन चितळे याने साकारली होती. सर्वोत्तम बाल कलाकार म्हणून राष्ट्रीय पुरस्कारानेही त्याला गौरविण्यात आलं होतं.‘श्वास’ चित्रपटामुळे एका रात्रीत स्टार झालेला हा अश्विन आता कसा दिसतो? काय करतो? असा प्रश्न अनेकांना पडला असेल.
3 / 8
‘श्वास’ या चित्रपटानंतर अश्विन देवराई, आहिस्ता आहिस्ता, जोर लगाके हय्या, आशायें, टॅक्सी नंबर 9211 अशा अनेक मराठी व हिंदी सिनेमात झकळला. बालकलाकार म्हणून त्याने खूप प्रसिद्धी मिळवली. पण नंतर मात्र त्याने अभ्यासावर लक्ष केंद्रीत केलं.
4 / 8
पुण्यातील नूतन मराठी विद्यालयातून शालेय शिक्षण घेतल्यानंतर त्याने एसीपी कॉलेजमधून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. आता तो टुरिस्ट गाईड म्हणून काम करतो, त्याचं रितसर प्रशिक्षण त्याने घेतलं आहे..
5 / 8
अश्विनने आता स्वत:चा व्यवसाय सुरु केला आहे. अश्विन हेरीटेज टुर्स असं त्याच्या कंपनीचं नाव असून तो स्वत: डायरेक्टर फाउंडर आणि सीईओदेखील आहे.
6 / 8
गेल्या चार वर्षांपासून अश्विन फारसी भाषेचं ज्ञान अवगत करतोय. इंडोलॉजीचा अभ्यासक म्हणून त्याने फारसी भाषा शिकायला सुरूवात केली.
7 / 8
याचदरम्यान त्याच्या आयुष्यात ‘रूमी’ आला. होय, दिग्गज सूफी कवी रूमीच्या कवितांनी त्याला वेड लावलं. यानंतर अश्विनने रूमीच्या आयुष्यात खोलवर डोकावायला सुरूवात केली.
8 / 8
रूमीच्या पौराणिक कथा, त्याचे साहित्य संकलित करून त्याने त्याचे भाषांतर केले. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंवर तो फक्त रूमीच्या शायऱ्या, कविता अपलोड करतो. रूमीवरच्या अनेक कार्यक्रमाचे नियोजन, कथाकथनही तो सादर करतो.
टॅग्स :अरुण नलावडेसिनेमामराठी अभिनेतासेलिब्रिटी