आदर्श शिंदेची पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री; अनेक एकांकिकांमध्ये केलंय काम By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 12:56 PM1 / 9मराठी कलाविश्वात शिंदेशाहीचा दबदबा असल्याचं साऱ्यांनाच ठावूक आहे. शिंदे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या आवाजाच्या जोरावर श्रोत्यांच्या मनावर राज्य केलं आहे.2 / 9प्रल्हाद शिंदे ते आदर्श शिंदे यांच्यापर्यंत या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने संगीत क्षेत्रात आपलं योगदान दिलं आहे. त्यामुळेच आज या कुटुंबातील काही महत्त्वाच्या सदस्यांविषयी जाणून घेऊयात.3 / 9मराठी कलाविश्वाला ‘देवा तुझ्या गाभाऱ्याला’, ‘सुन्या सुन्या’, ‘अंबे कृपा करी’ यांसारखी सुपरहिट गाणी देणारा प्रसिद्ध गायक म्हणजे आदर्श शिंदे.4 / 9आपल्या आवाजामुळे कलाविश्वात हक्काचं स्थान निर्माण करणाऱ्या आदर्शच्या प्रोफेशनल लाइफविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. मात्र, त्याच्या पर्सनल लाइफविषयी फार मोजक्यांना माहित आहे.5 / 9आज आपण आदर्शच्या पत्नीविषयी जाणून घेऊयात. आदर्शच्या पत्नीचं नाव नेहा असं असून ती देखील त्याच्याप्रमाणेच गायिका आणि अभिनेत्री आहे.6 / 9नेहा आणि आदर्शचं लव्हमॅरेज असून त्यांची पहिली भेट कॉलेजमध्ये असताना झाली.7 / 9नेहाचं पूर्वाश्रमीचं नाव नेहा अरविंद लेले असं आहे. त्यानंतर आदर्शसोबत लग्न करुन ती शिंदे कुटुंबाचा भाग झाली.8 / 9नेहा उत्तम गायिका असण्यासोबतच अभिनेत्रीही आहे. तिने कॉलेज जीवनात अनेक एकांकिकांमध्ये काम केलं आहे.9 / 9नेहा वडाळ्यात लहानाची मोठी झाली असून सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं. आणखी वाचा Subscribe to Notifications