Join us

PHOTOS: अशी आहे मृणाल कुलकर्णी यांची लव्हस्टोरी, पाहा मृणाल-रूचिर यांचे खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 1:20 PM

1 / 8
अभिनेत्री मृणाल कुलकर्णी या दिग्गज अभिनेत्री. राजा शिवछत्रपती किंवा फर्जंद मधील आई जिजाऊ असोत, लढवय्यी अवंतिका असो वा मुलांना मदत करणारी सोनपरी. विविध शेड्स असणाºया भूमिका मृणाल यांनी अगदी लीलया साकारल्या.
2 / 8
मृणाल आजही वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये बिझी आहेत. पण कितीही बिझी असल्या तरी कुटुंबासाठी त्या आवर्जुन वेळ देतात. त्यांच्या कुटुंबाचे अनेक फोटो त्या शेअर करताना दिसतात.
3 / 8
सतत काम, पुणे मुंबई प्रवास, घर या सगळ्यात त्यांचे पती रूचिर कुलकर्णी यांची त्यांना पूर्ण साथ लाभते. रूचिर यांच्यासोबतचे अनेक फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे.
4 / 8
1990 साली रूचिर व मृणाल यांचा विवाह झाला. अगदी वयाच्या 19 व्या वर्षी मृणाल लग्नबेडीत अडकल्या. मृणाल व रूचिर यांच्या लग्नाला तीन दशकांचा काळ लोटला आहे.
5 / 8
मृणाल आणि रुचिर यांचा कलाक्षेत्राशी संबंध लहानपणापासून. मृणालजींचे आजोबा म्हणजे प्रसिद्ध लेखक गो.नी. दांडेकर आणि रुचिर यांचे वडील म्हणजे जयराम कुलकर्णी. अनेक मराठी सिनेमामध्ये त्यांनी निभावलेली पोलिसांची भूमिका आपल्याला माहिती आहेतच.
6 / 8
मृणाल आणि रुचिर एकमेकांना तसे लहानपणापासून ओळखत. पण पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर त्यांच्यात ख-या अर्थाने मैत्री झाली. रुचिर हे मृणाल यांना कॉलेजमध्ये सिनियर होते.
7 / 8
रूचिर त्यांच्या एका नाटकातल्या भुमिकेसाठी एका मुलीचा शोध चालू होता. त्यांच वेळी मृणाल ‘स्वामी’ या सुप्रसिद्ध झालेल्या मालिकेत काम करत असत. त्यांनी मृणाल यांना या भूमिकेसाठी विचारलं. त्यांनीही होकार दिला. कामानिमित्त सहवास वाढत गेला आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात कधी झालं हे त्यांनाच कळलं नाही.
8 / 8
१० जून 1990 रोजी दोघांनीही लग्न केलं. लग्नाला बरीच वर्षे झाली, पण अजूनही या जोडप्याची केमिस्ट्री अजूनही अबाधित आहे. इन्स्टाग्रामवरच्या अनेक फोटोत या केमिस्ट्रीची झलक पाहायला मिळते.
टॅग्स :मृणाल कुलकर्णी