By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 15:47 IST
1 / 7गौतमी देशपांडे आणि मृण्मयी देशपांडे यांच्या भावाचं नुकतंच लग्न झालं. या लग्नात देशपांडे बहिणींनी केलेलं फोटोशूट चांगलंच व्हायरल झालंय2 / 7मृण्मयी-गौतमी या दोघींनी भावाच्या लग्नात चांगलीच मजा-मस्ती केलेली दिसली. भावाच्या पाठीमागे दोघा बहिणींचा चांगलाच आधार दिसला3 / 7मृण्मयीने लग्नात पिवळ्या रंगाची तर गौतमीने लाल रंगाची साडी परिधान केली होती. दोघीही खूप सुंदर दिसत होत्या.4 / 7मृण्मयी देशपांडेने भावाच्या लग्नात फोटो काढायची हौसही भागवून घेतली. तिने पती स्वप्नील रावसोबत खास फोटोशूट केलं जे चर्चेत आहे5 / 7मृण्मयी आणि तिचा पती स्वप्नील रावच्या या फोटोशूटला त्यांच्या चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली. 6 / 7याच फोटोशूटमध्ये मृण्मयीच्या एका नातेवाईकाने मागे मजेशीर पोज दिलेली पाहायला मिळाली.7 / 7मृण्मयी आणि स्वप्नील हे मुंबईपासून दूर महाबळेश्वरला वास्तव्यास आहेत. भावाच्या लग्नानिमित्ताने संपूर्ण देशपांडे कुटुंब एकत्र आलं