शिपायाची लेक झाली नागराजची हिरोईन; 'बापल्योक'च्या पायलची स्ट्रगल स्टोरी By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 2:03 PM1 / 9नागराज मंजुळे यांचा बापल्योक हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमातून वडील आणि मुलाच्या नात्यावर प्रकाश टाकला जाणार आहे.2 / 9सध्या हा सिनेमा वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत आहे. यामध्येच सध्या त्यातील अभिनेत्री पायल जाधव हिची चर्चा रंगली आहे. या सिनेमाच्या माध्यमातून नागराज यांनी पुन्हा एका नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे.3 / 9नागराज मंजुळे कायम रॉ टॅलेंटचा शोध घेऊन गावखेड्यातील कलाकारांना सिनेमात संधी देत असतात. अशीच संधी त्यांनी बापल्योकच्या पायलला दिली आहे.4 / 9पायल एका शिपायाची लेक असून तिचा हा प्रवास सोपा नव्हता. एका मुलाखतीमध्ये तिने तिची संघर्ष काहानी सांगितली आहे.5 / 9पायलचे वडील मूळचे शेतकरी परंतु, गावात पाण्याचा दुर्भिक्ष्यामुळे त्यांनी गाव सोडलं आणि ते पुण्यात आले.6 / 9पायलचे वडील पुण्यात आल्यानंतर त्यांनी सरस्वती विद्यामंदिरमध्ये शिपाई म्हणून काम केलं. याच शाळेत पायलने तिचं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर तिने पुणे विद्यापीठातून मास्टर्स इन हेल्थ सायन्समधून पदवी घेतली.7 / 9पायलने ललित कला केंद्रामध्ये मास्टर्स इन भरतनाट्य केलं आहे. बापल्योकच्या माध्यमातून ती कलाविश्वात पदार्पण केलं आहे. त्यामुळे हा सिनेमा तिच्यासाठी स्पेशल असल्याचं म्हटलं आहे.8 / 9पायल सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.9 / 9नागराज मंजुळे निर्मित आणि मकरंद माने दिग्दर्शित बापल्योक सिनेमा २५ ऑगस्टला रिलीज होणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications