'घुमा'चा मराठमोळा ठसका! पैठणीच्या ड्रेसमधल्या अदांनी नम्रताने चाहत्यांना केलं घायाळ By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 12:05 PM1 / 9'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे नम्रता संभेराव. उत्तम अभिनय आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधत नम्रता प्रेक्षकांना खळखळवून हसवते. 2 / 9नम्रता 'नाच गं घुमा' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात ती मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. 3 / 9सध्या नम्रता 'नाच गं घुमा' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. सिनेमाच्या प्रमोशनसाठी नम्रताने खास लूक केला होता. 4 / 9पिवळ्या रंगाचा पैठणी ड्रेस नम्रताने परिधान करत पारंपरिक लूक केला होता. 5 / 9नम्रताचे या मराठमोळ्या लूकमधील काही फोटो समोर आले आहेत. 6 / 9या फोटोमध्ये घुमाचा मराठमोळा ठसका पाहायला मिळत आहे. नम्रताने पैठणी ड्रेसवर कानात झुमके आणि नाकात नथही घातली आहे. 7 / 9ड्रेसच्या मागच्या बाजूला 'नाच गं घुमा' असं सिनेमाचं नावही लिहिलेलं दिसत आहे. 8 / 9तिच्या या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नम्रताने फोटोसाठी खास पोझही दिल्या आहेत. 9 / 9घुमाच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications