Join us

पूजा सावंतनं शेअर केले नवऱ्यासोबतचे खास रोमँटिक फोटो, चाहत्यांना देत आहेत कपल गोल्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 11:22 IST

1 / 10
पूजा सावंत (Pooja Sawant) आज आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. मराठीसह हिंदीतही तिने अभिनयाच्या जोरावर स्वतःची छाप उमटवली आहे.
2 / 10
सध्या पूजा तिचा नवरा सिद्धेश चव्हाणसोबत (Siddhesh Chavan) ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली असून सुखाचा संसार करतेय.
3 / 10
आज पूजा पतीचा वाढदिवस साजरा करत आहे. सिद्धेशच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर करून तिने त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
4 / 10
पूजाने सिद्धेशसोबतचे खास फोटो पोस्ट केले आहेत. यात दोघांचा रोमँटीक अंदाज पाहायला मिळतोय.
5 / 10
फोटोसोबत कॅप्शनमध्ये पुजाने लिहलं, 'हॅपी बर्थडे माझ्या सिड्डी बॉय... तू माझ्या आयुष्यात आलास त्या क्षणापासून प्रत्येक क्षण खूपच खास वाटतो आ'.
6 / 10
पुढे ती म्हणते, 'तू आपल्या या प्रवासाला एका सुंदर आणि कालातीत सुरासारखं सजवलंस... चल या प्रवासात एकत्र जादू निर्माण करूया. हॅप्पी हॅप्पी हॅप्पी बर्थडे बब्सी!'
7 / 10
पूजाच्या या पोस्टवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केलाय. अनेकांनी कमेंट करत सिद्धेशला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.
8 / 10
पूजाचा नवरा ऑस्ट्रेलियातील एक फायनान्स कंपनीत कामाला आहे. अभिनेत्रीचं हे ऑरेंज मॅरेज आहे.
9 / 10
पुजा सध्या ऑस्ट्रेलियात असली तरीही तिचे भारतात अजूनही तितकेच चाहते आहेत. त्यामुळे ती सतत तिचे नवनवे फोटो शेअर करून तिच्या फॅन्सच्या संपर्कात राहते.
10 / 10
पुजाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटची 'मुसाफिरा' या चित्रपटात झळकली होती. यात तिच्यासोबत पुष्कर जोग, दिशा परदेशी आणि पुष्कराज चिरपुटकर हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. आता चाहत्यांना तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल उत्सुकता आहे.
टॅग्स :पूजा सावंतसेलिब्रिटीमराठी अभिनेता