Pooja Sawant ने गुपचूप उरकला साखरपुडा?, अभिनेत्री म्हणाली... By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 7:06 PM1 / 9अभिनेत्री पूजा सांवत मागील काही दिवसांपासून एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. तिने गुपचूप साखरपुडा उरकल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. 2 / 9अभिनेत्रीने या चर्चेवर मौन सोडत खुलासा केला आहे.3 / 9काही दिवसांपूर्वी पूजा सावंतने तिच्या इन्स्टाग्रावर तिचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले होते. या फोटोत पूजा नेहमीप्रमाणे खुपच सुंदर दिसते आहे.4 / 9या फोटोत पूजाच्या हातात एक रिंग दिसली. त्यानंतर तिने एंगेजमेंट केल्याच्या चर्चांना उधाण आले. अखेर तिने यावर प्रतिक्रिया दिली.5 / 9एका मुलाखतीत पूजाने या वृत्तावर मौन सोडले. ती म्हणाली की, असं काही नाही. तिने अंगठी उजव्या हातात घातली आहे.6 / 9तिचा साखरपुडा झालेला नाही. तिला देखील हे वृत्त खूप उशिरा कळले. 7 / 9इतकंच नाही तर पूजा म्हणते की, साखरपुडा करण्यासाठी आयुष्यात कोणीतरी हवे..8 / 9यावरुन पूजा सावंत अद्याप सिंगल असून ही निव्वळ अफवा आहे.9 / 9पूजा सावंत लवकरच मुसाफिरा चित्रपटात झळकणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications