लग्नानंतर पूजा सावंत करणार अभिनयाला रामराम?; ऑस्ट्रेलियात होणार स्थायिक By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 2:44 PM1 / 8मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत सध्या (Pooja Sawant) प्रोफेशनल लाइफसोबत खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. 2 / 8काही दिवसांपूर्वी तिने साखरपुडा झाल्याची खुशखबर दिली आणि सर्वांना सुखद धक्का दिला. ती सिद्धेश चव्हाणसोबत लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. 3 / 8पूजाने तिच्या लग्नाची माहिती चाहत्यांना दिल्यापासून तिच्याविषयी अनेक गोष्टी चर्चिल्या जात आहेत.4 / 8पूजा लग्नानंतर करिअर सोडणार का? ती तिच्या नवऱ्यासोबत ऑस्ट्रेलियाला स्थायिक होणार का? असे प्रश्न चाहत्यांना पडत आहेत. यावर पूजाने नुकतंच उत्तर दिलं आहे.5 / 8पूजाने नुकतीच 'लोकसत्ता'च्या 'डिजिटल अड्डा'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या लग्नानंतरचा प्लॅन सांगितला.6 / 8सिद्धेश कायमस्वरुपी ऑस्ट्रेलियात नाहीये. तो अलिकडेच २ वर्षांपूर्वी तिकडे शिफ्ट झालाय. तो मूळचा मुंबईचा असून त्याचे आई-बाबा मुंबईतच आहेत. त्यामुळे आम्ही सगळे मुंबईमध्येच राहणार आहोत, असं पूजा म्हणाली.7 / 8पुढे ती म्हणते, सिद्धेश अजून काही वर्ष ऑस्ट्रेलियात राहणार आहे. त्यामुळे मी सुद्धा काही वर्ष तिकडे येऊन-जाऊन करेन. हे अरेंज मॅरेज असल्यामुळे आम्ही सगळ्या गोष्टींसाठी तयार आहोत.”8 / 8दरम्यान, पूजा मुंबईमध्येच लग्न करणार आहे. यापूर्वी ती डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, तिने मुंबईमध्येच लग्न करणार असल्याचं स्पष्ट केलं. आणखी वाचा Subscribe to Notifications