प्राजक्ता माळी हे २ साउथचे अभिनेते आहेत क्रश, तर बॉलिवूडचा हा अभिनेता आहे फेव्हरेट By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2024 4:32 PM1 / 9अभिनेत्री प्राजक्ता माळी मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे.2 / 9प्राजक्ता माळीचा निर्मिती असलेला फुलंवती हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे.3 / 9 चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद पाहून तिने तिच्या चाहत्यांचे नेहमीच आभार मानले आहेत. 4 / 9अशातच आता या चाहत्यांच्या अधिक जवळ जाण्यासाठी तिने आस्क मी एनीथिंग मधून चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचे ठरवले. या माध्यमातून तिच्या चाहत्यांनी तिला वेगवेगळे प्रश्न विचारले आहेत. 5 / 9प्राजक्ता माळीला अध्यात्मिकतेकडे कधी वळली यावर तिने उत्तर देताना म्हटले की, जेव्हा ब्रेकअप झालं त्यानंतर मी डिप्रेशनमध्ये गेले होते. पण अध्यात्मतेचा मार्ग स्वीकारला आणि तटातून मी बाहेर पडले.6 / 9तर एका चाहत्याने प्राजक्ता माळीला चक्क लग्नाची मागणीदेखील घातलेली पाहायला मिळाली. तू माझ्याबरोबर लग्न करणार का, तुझ्यामुळे मी पण लग्न नाही केलं, त्यावर प्राजक्ता म्हणाली की, माझे काही खरे नाही…तुम्ही करून टाका (सगळेच जे थांबलेत..) (जनहित में जारी…) म्हणत प्राजक्ताने अजूनतरी लग्न करणार नाही असे म्हटले आहे. 7 / 9यावेळी प्राजक्ता माळीला तुझा कोणी क्रश आहे का, असेही विचारण्यात आले. त्यावर प्राजक्ताने दोन साउथच्या अभिनेत्याची नावे घेतली. अगोदर नानी आवडत होता, आणि आता ‘जयम रवी’ आवडतो. दोघेही दाक्षिणात्य सुपरस्टार आहेत. 8 / 9प्राजक्ता पुढे म्हणाली की, पण तरीही माझं रणबीरवर कायम प्रेम राहील.9 / 9प्राजक्ता माळी सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमध्ये काम करताना दिसत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications