प्राजक्ता माळी लग्नासाठी तयार, पण नवरदेवासाठी ठेवलीय 'ही' खास अट; जाणून घ्या याबद्दल By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 7:00 AM1 / 9अभिनेत्री प्राजक्ता माळी सतत वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत असते. प्राजक्ता सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. 2 / 9बऱ्याचदा प्राजक्ताच्या लग्नाची चर्चा रंगताना दिसते. मात्र प्राजक्ताला हवा तसा जोडीदार मिळालेला नाही.3 / 9काही दिवसांपूर्वी प्राजक्ता माळीने तिला कसा नवरा हवाय, याबद्दल सांगितले होते.4 / 9प्राजक्ता माळी म्हणाली होती की, 'मी लग्न करायला तयार आहे. परंतु माझी एक अट आहे. एक तर तो मुलगा निर्व्यसनी हवा आणि दुसरी म्हणजे तो माझ्यापेक्षा वयानं मोठा असायला हवा.' 5 / 9असं का असा प्रश्न प्राजक्ताला विचारला असता तिने सांगितले की, 'माझ्यापेक्षा वयाने मोठी असलेल्या व्यक्ती मला आवडतात. त्यांच्यातील मॅच्युअरीटी मला भावते. त्यामुळे जेव्हा लग्न करीन तेव्हा माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या मुलाशीच करेन.'6 / 9प्राजक्ता माळी काही दिवसांपूर्वी श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात गेली होती. त्यावेळी तिने त्यांना 'लग्न करणे खरेच गरजेचे आहे का?' असे विचारले होते. 7 / 9त्यावेळी श्री श्री रविशंकर यांनी उत्तर दिले की, 'तू मला विचारत आहेस. असे असते तर कधीच माझ्या बाजूला अजून एक खुर्ची लागली असती. लग्न केले पाहिजे हे काही गरजेचे नाही. आनंदी राहणे महत्त्वाचे आहे.8 / 9तुम्ही लग्न करुन आनंदी राहू शकता, तसंच लग्न न करताही आनंदी राहू शकता. काही लोक लग्न करुनही दुःखी असतात. काही एकटेपणामुळे दुःखी असतात. त्यामुळे तुम्हाला काय हवं, हे तुम्ही निवडा. आनंद हा सर्वात महत्त्वाचा, असे श्रीश्री रविशंकर म्हणाले होते.9 / 9प्राजक्ताचे चाहते तिच्या लग्नाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications