नवरा-बायको म्हणजे मागच्या जन्मातील शत्रू! प्राजक्ता माळी म्हणाली, "माझा जोडीदार..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 15:14 IST
1 / 9मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) महाराष्ट्राची लाडकी आहे. तिला सतत 'लग्न कधी करणार?','कोणी बॉयफ्रेंड आहे का','तुला कसा जोडीदार हवा?' असे प्रश्न हमखास विचारले जातात.2 / 9प्राजक्ताने आतापर्यंत अनेकदा लग्नाला वेळ आहे असंच उत्तर दिलं. पण नुकतंच एका मुलाखतीत तिने आईला मुलगा शोधायला सांगितलं असल्याचा खुलासा केला.3 / 9सुमन म्युझिक पॉडकास्टमध्ये प्राजक्ताला कसा जोडीदार हवा? तुझ्या अपेक्षा काय आहेत असा प्रश्न विचारण्यात आला. यावर तिने एकदम आश्चर्यकारक उत्तर दिलं आहे.4 / 9प्राजक्ता म्हणाली, 'आपण जोडीदार कसा हवा याबद्दल अपेक्षांची यादी बनवतो. पण प्रत्यक्षात जेव्हा आपल्याला जो मिळतो तो त्या यादीत कुठेच बसणारा नसतो.'5 / 9'ते म्हणतात ना लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधलेल्या असतात. मध्यंतरी माझ्या वाचनात आलं की आपल्या सर्वात जवळची जी माणसं असतात त्यांच्यासोबत आपलं मागच्याच जन्मात कर्म जोडलेलं असतं.' 6 / 9'काही कर्म हे चांगले असतात काही खूप क्लेशदायक असतात. विशेषत: नवरा-बायकोचं नातं खूपच मोठं कर्म घेऊन आलं असतं. अनेकदा ते तुमचे गेल्या जन्मीचे शत्रू असतात.'7 / 9'त्यामुळे आपण खूप बाहेरच्या गोष्टी बोलतो की दिसायला असा हवा, याच प्रोफेशनचा हवा. पण असं नसतं. ज्याचं मागच्या जन्मापासून आपल्यासोबत मोठं कर्म जोडलेलं आहे तोच आयुष्यात येणार.'8 / 9'माझा या सगळ्यावर विश्वास आहे. आयुष्यात जो तुम्हाला धडकणार आहे तो धडकणार. कधी कधी आपल्याला जाणवतं की अरे हा तर पाच वर्ष आपल्या आजूबाजूलाच होता कधी दिसला नाही. त्यामुळे विशेषत: या गोष्टीत आपलं काहीच चालत नाही. जे नशिबात आहे ते घडणार.'9 / 9प्राजक्ताचा अध्यात्मावर खूप विश्वास आहे. ती अनेकदा श्री श्री रविशंकर यांच्या प्रवचनाला जात असते. तिथेही तिने 'आयुष्यात लग्न करणं गरजेचं आहे का? असा प्रश्न विचारला होता जो व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता.