Join us

माझी तुझी रेशीमगाठ...! पाहा, प्रार्थना बेहरेचे नवऱ्यासोबतचे रोमॅन्टिक फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 5:16 PM

1 / 11
प्रार्थना बेहरे ही प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री. सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असलेली प्रार्थना सतत स्वत:चे सुंदर फोटो शेअर करत असते. पण नवऱ्यासोबतचे तिचे हे फोटोही कमी सुंदर नाहीत.
2 / 11
हे कपल एकमेकांसोबतचे रोमॅन्टिक फोटो शेअर करत असते. अशाच काही फोटोंवर एक नजर
3 / 11
प्रार्थना बेहरेने अभिषेक जावकरसोबत लग्नगाठ बांधली. गेल्या चार वर्षांपासून ते सुखात संसार करत आहेत.
4 / 11
अभिषेक हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध डिस्ट्रीब्युटर आहे. लेखक, दिग्दर्शक अशीही त्याची ओळख आहे.
5 / 11
विवाह मंडळाच्या माध्यमातून प्रार्थनासाठी अभिषेकचं स्थळ आलं आणि 14 नोव्हेंबर 2017 रोजी या दोघांनी लग्नगाठ बांधली.
6 / 11
डब्बा ऐस पैस, शुगर, सॉल्ट आणि प्रेम या मराठी चित्रपटांची सहनिर्मिती त्याने केली आहे.
7 / 11
मिसिंग ऑन अ वीकेंड या हिंदी चित्रपटातून अभिषेकने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले.
8 / 11
प्रार्थनाने आधी पवित्र रिश्ता मालिकेतून छोटा पडदा गाजवला.
9 / 11
त्यानंतर जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा या मराठी चित्रपटातून दणक्यात मोठ्या पडद्यावर पदार्पण केले.
10 / 11
प्रार्थनाचे मितवा, कॉफी आणि बरंच काही , मिस्टर अँड मिसेस सदाचारी, बायकर्स अड्डा आणि व्हॉट्स अ‍ॅॅप लग्न या चित्रपटांमध्येही ती झळकली आहे.
11 / 11
लवकरच प्रार्थना ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत दिसणार आहे. 11 वर्षांनी ती या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर पदार्पण करतेय.
टॅग्स :प्रार्थना बेहरे