खतरनाक! सेकंड हनिमूनसाठी बायकोला थायलंड घेऊन गेला प्रथमेश परब, वाघाच्या शेजारी बसून काढला फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 12:49 IST
1 / 7प्रथमेश परब हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. टाइमपास मुळे तो प्रसिद्धीझोतात आला. 2 / 7वेडिंग अॅनिव्हर्सरीनिमित्त प्रथमेश पत्नी क्षितीजासह थायलंडला गेला आहे. थायलंडमधील फुकेत येथे ते दोघे त्यांचा क्वालिटी टाइम घालवत आहेत. 3 / 7गेल्याच वर्षी प्रथमेशने लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली. आज त्याच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे. 4 / 7थायलंड ट्रिपचे फोटो प्रथमेश आणि क्षितीजाने सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. 5 / 7या फोटोंमधील वाघाबरोबरच्या त्यांच्या फोटोने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. 6 / 7प्रथमेश आणि क्षितीजाच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 7 / 7प्रथमेश आणि क्षितीजाने गेल्यावर्षी २४ फेब्रुवारीला लग्नगाठ बांधली होती. त्याआधी काही वर्ष ते एकमेकांना डेट करत होते.