दादूसच्या लाडक्या प्राजूची हळद; क्षितीजाला लागला प्रथमेशच्या प्रेमाचा रंग By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 11:54 AM1 / 8मराठी कलाविश्वात सध्या लग्नसराईचे वारे वाहत आहेत. यात सध्या अभिनेता प्रथमेश परब याच्या घरी लगीनघाईला सुरुवात झाली आहे.2 / 8येत्या २४ फेब्रुवारी तारखेला म्हणजेच उद्या प्रथमेश आणि क्षितीजा लग्नगाठ बांधणार आहेत. त्यामुळे या दोघांच्याही घरी लग्नापूर्वीच्या विधी, कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे.3 / 8नुकतीच प्रथमेशच्या हळदी समारंभाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर आता त्याच्या प्राजूला म्हणजेच क्षितीजालाही त्याच्या नावाची हळद लागली आहे.4 / 8क्षितीजा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती त्यांच्या लग्नातील प्रत्येक समारंभ, कार्यक्रम यांचे अपडेट चाहत्यांना देत आहे.5 / 8क्षितीजाने तिच्या हळदी समारंभाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. विशेष म्हणजे ती कमालीची सुंदर दिसत आहे.6 / 8क्षितीजाने या हळदीसाठी खास पिवळ्या रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान केला होता. सोबतच फुलांची ज्वेलरी सुद्धा घातली होती.7 / 8“गजर झाला दारी, साजनाची स्वारी…साजनाची स्वारी आली लाज गाली आली….” असं सैराटमधलं गाणं कॅप्शनमध्ये देत क्षितीजाने हे फोटो शेअर केले आहेत.8 / 8अलिकडेच क्षितीजाने सोलो प्री वेडिंग शूट केलं होतं. तिच्या या फोटोशूटचीही नेटकऱ्यांमध्ये प्रचंड चर्चा झाली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications