Raksha Bandhan 2022 : एक हजारों में मेरी बहना है! मराठी कलाविश्वातील या आहेत सख्या बहिणी, पाहा फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 9:00 AM1 / 8Raksha Bandhan 2022 : मराठी सिनेइंडस्ट्रीत जसे स्टार्स आणि स्टार किड्सची जोडी आपल्याला पाहायला मिळते, तशीच सख्या बहिणींची जोडीही इंडस्ट्रीत कार्यरत आहे.2 / 8पूर्णिमा तळवळकर आणि पल्लवी वैद्य – या दोघी बहिणींनी अनेक मालिकांमध्ये काम केले. सध्या झी मराठीवरील अतिशय लोकप्रिय असलेली मालिका म्हणजे मन उडू उडू झाल या मालिकेत पूर्णिमा तळवळकर या इंद्रा याच्या आईची भूमिका साकारताना दिसत आहेत. तसेच रंग माझा वेगळा मालिकेत श्वेताच्या आईच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. पल्लवी वैद्य मी अजून गीत गात आहे मालिकेत सध्या काम करताना दिसते आहे.3 / 8गौतमी देशपांडे आणि मृण्मयी देशपांडे – या दोघींची जोडी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींची जोडी म्हणून ओळखली जाते. मृण्मयी प्रामुख्याने मराठी व हिंदी चित्रपटात भूमिका करते. बॉलिवूड मधील हमने जीना सीख लिया तर मराठी एक मोकळा श्वास, धामधूम, अनुराग नटसम्राट चित्रपटाचा उल्लेख आपल्याला प्रामुख्याने येथे करता येईल. गौतमीने सोनीवरील सारे तुझ्याचसाठी मालिकेतून अभिनयात पदार्पण केलं होतं. मृण्मयी आणि गौतमी सोशल मीडियावर नेहमी एकमेंकीसोबतचे फोटो शेअर करत असतात. फोटोंमध्ये दोघींमधले बॉन्डिंग नेहमी दिसते.4 / 8भारती आचरेकर आणि वंदना गुप्ते - वागळे कि दुनिया या मालिकेत भारती आचरेकर राजेश वागळेच्या आईची भूमिका साकारताना दिसतायेत. भारती आचरेकर आणि वंदना गुप्ते या दोघीही सख्या बहिणी आहेत. अनेक सर्वाजनिक ठिकाणी दोघेही नेहमी एकत्र दिसतात. मराठीच नाही तर हिंदी कलाविश्वातसुध्दा या दोघी बहिणी आपल्या अभिनयासाठी प्रसिद्ध आहेत. 5 / 8खुशबू तावडे, तितिक्षा तावडे- या दोघी बहिणींनी आजवर विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी काम केलेल्या सर्वच मालिका या हिट राहिलेल्या आहेत.6 / 8भार्गवी चिरमुले आणि चैत्राली गुप्ते – या दोघींची जोडी देखील प्रचंड लोकप्रिय आहे या दोघींनी आजवर मालिकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावल्या आहेत. 7 / 8समिधा गुरु आणि मृणाल देशपांडे – समिधाने देवयानी,कमला, तुजविण सख्या रे अशा अनेक मालिकांमध्ये अभिनेत्री समिधानेने काम केले आहे. तर पुढचं पाऊल, छत्रीवाली अग्नीहोत्र या मालिकांमध्ये मृणाल यांनी काम केले आहे.8 / 8सुप्रिया पाठारे आणि अर्चना नेवरेकर – या दोघींनी देखील मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. सुप्रिया पाठारे या चित्रपट अभिनेत्री असून छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये देखील त्यांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. सुप्रिया पाठारे या होणार सून मी या घरची ,कुलवधू ,जागो मोहन प्यारे तसेच ठिपक्यांची रांगोळी इत्यादी मालिकांमधून अनेक भूमिका साकारल्या आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications