लालछडी..! प्राजक्ता माळी लाल ड्रेसमधील फोटो केले शेअर, फोटोंना मिळतेय पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2024 03:27 PM2024-12-10T15:27:23+5:302024-12-10T15:39:15+5:30

Prajakta Mali: अभिनेत्री प्राजक्ता माळीचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत.

प्राजक्ता माळी मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. प्राजक्ता सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते.

नुकतेच प्राजक्ताने रेड ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.

प्राजक्ता माळीने फोटो शेअर करत तिने वजन घटवल्याचे सांगितले. तसेच तिने तिला ५० किलो वजन करायचे असल्याचे सांगितले.

प्राजक्ता माळी या फोटोत खूपच सुंदर दिसते आहे.

प्राजक्ता माळीच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

प्राजक्ता माळीचा शेवटचा फुलवंती हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाची तिने निर्मिती केली आहे.

यात प्राजक्ताने फुलवंतीची भूमिका साकारली आहे. तिच्यासोबत गश्मीर महाजनी मुख्य भूमिकेत आहे.

सध्या प्राजक्ता महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमध्ये पाहायला मिळत आहे.