रीमा लागू यांची लेक दिसते खूप सुंदर, तीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री; जाणून घ्या तिच्याबद्दल By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 2:39 PM1 / 11Reema Lagoo: बॉलिवूडमध्ये आईची भूमिका साकारून लोकप्रियता मिळवलेल्या रीमा लागू यांची आज पुण्यतिथी आहे. २०१७ साली आजच्या दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले होते. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2 / 11अनेक टीव्ही कार्यक्रमांशिवाय रीमा यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्येही काम केले होते. रीमा लागू यांना चित्रपटातील आईच्या भूमिकेसाठी लक्षात ठेवले जाते.3 / 11केवळ चित्रपटांमध्येच नाही तर वास्तविक जीवनातही रीमा लागू यांची प्रतिमा एका आधुनिक आईची होती, जिने स्वतःच्या जीवावर सर्व सांभाळलं. रिमा लागू यांची मुलगी मृण्मयी लागू हीदेखील अभिनेत्री आहे. तिच्याबद्दल फारसे कुणाला माहित नाही.4 / 11मृण्मयी आईसारखीच दिसायला खूप सुंदर आहे आणि ती एक उत्तम अभिनेत्री आहे.5 / 11२०१० साली रिलीज झालेल्या ‘हॅलो जिंदगी’ या हिंदी चित्रपटांत मृण्मयीने काम केले आहे. 6 / 11 त्याचप्रमाणे ‘दोघांत तिसरा आता सगळं विसरा’ चित्रपटात तिने पुष्कर ओकच्या पत्नीची भूमिका निभावली होती. या चित्रपटातील तिचे काम आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. 7 / 11त्याचप्रमाणे ‘बायको’, ‘सातच्या आत घरात’, ‘मुक्काम पोस्ट लंडन’ ह्या निवडक मराठी चित्रपटांत तिने काम केलेले आहे.8 / 11अभिनयाव्यतिरिक्त तिने सेकंड युनिट डायरेक्टर आणि असिस्टंट डायरेक्टर म्हणून ‘तलाश’, ‘थ्री इडियट्स’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ सारख्या चित्रपटांसाठी काम केलेले आहे.9 / 11त्याच सोबत तिने ‘दंगल’, ‘जेट ट्रॅश’, ‘पीके’, ‘गुलाब गॅंग’ ह्यासारख्या चित्रपटांसाठी स्क्रिप्ट सुपरवायजर म्हणून काम केलेले आहे. 10 / 11 मृण्मयीने १ डिसेंबर २०१४ साली विनय वायकुळ या असिस्टंट डायरेक्टर सोबत लग्न केले. 11 / 11मृण्मयी लागूने नामकरण या हिंदी मालिकेतही काम केले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications