Join us

रेशम टिपणीस ते शिवानी सुर्वे या पाच मराठी अभिनेत्री राहतात लिव्ह-इनमध्ये; जाणून घ्या कोण आहेत त्यांचे पार्टनर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 20:25 IST

1 / 5
अदिश वैद्य - रेवती लेले हे गोड कपल तुमच्यापैकी अनेकांना माहितच असेल. लग्नाची बेडी मालिकेतून सध्या रेवती प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. तर अदिश आपल्याला अनेक मालिकांमध्ये दिसला आहे. दोघंही नेहमीच एकमेकांसोबत दिसतात. तसेच त्यांचे गोड व्हिडीओस सुद्धा सोशल मीडियावर पाहायला मिळतात. तसेच काहीच महिन्यांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी लवकरच लग्न करणार असल्याचं सांगितलं होतं.
2 / 5
रेशम टिपणीस - संदेश किर्तीकर बिग बॉस फेम अभिनेत्री रेशम टिपणीस आणि संदेश किर्तीकर हेसुद्धा एकमेकांना डेट करत आहेत. दोघांनी अजून लग्न केलं नाही मात्र ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत. रेशमनचं १९९३ साली हिंदी टिव्ही अभिनेते संजीव सेठ यांच्य़ाशी लग्न झालं होतं. त्यांना दोन मुलंही आहेत. मात्र २००४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
3 / 5
ईशा केसकर- ऋषी सक्सेना काहे दिया परदेस मालिकेतून लोकप्रिय झालेला अभिनेता ऋषी सक्सेना आणि जय मल्हार मालिकेतून लोकप्रिय झालेली ईशा केसकर हे दोघंही एकमेकांना गेले अनेक वर्षांपासून डेट करतायेत. अनेकदा त्यांच्या लग्नाच्या चर्चाही रंगतात.
4 / 5
शिवानी सुर्वे- अजिंक्य ननावरे अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अंजिक्य ननावरे हे कपलसुद्धा त्यांच्या चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. दोघंही गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करतायत. अनेकदा ते एकमेकांसोबत दिसतात. लवकरच ते लग्नही करतील असंही म्हणायला हरकत नाही.
5 / 5
नक्षत्रा मेढेकर- अभिजीत आमकर अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर आणि अभिनेता अभिजीत आमकरसुद्धा गेल्या अनेक दिवसांपासून डेट करतायेत. लवकरच हे दोघेही लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा आहे.
टॅग्स :रेशम टिपणीसईशा केसकरऋषी सक्सेनाशिवानी सुर्वे