Join us

सचिन खेडेकर यांची पत्नी कलाविश्वाऐवजी या क्षेत्रात आहे कार्यरत, मोठा लेक असतो परदेशात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2022 7:00 AM

1 / 12
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि गुणी अभिनेता म्हणजे सचिन खेडेकर. (Sachin Khedekar)
2 / 12
सचिन खेडेकर यांचा जन्म १४ मे १९६५ मध्ये झाला . सचिन खेडेकर यांनी अनेक भाषांमध्ये काम केले आहे. त्यांची वेगळी अशी छाप मराठी तसेच हिंदी सिनेइंडस्ट्रीवर पडली आहे.
3 / 12
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील चित्रपटही त्यांनी साकारून सर्वांचीच मन जिंकली होती. सचिन खेडेकर हे उत्कृष्ट अभिनेत्यासोबतच एक उत्तम व्यक्ती देखील आहेत.सचिन खेडेकर यांना त्यांनी काम केलेल्या चित्रपटासाठी अनेक पुरस्कार देखील मिळाले.
4 / 12
अर्जुन पंडित, दाग द फायर, अस्तित्व, बिच्छू, जंग, हम प्यार तुम्ही से कर बैठे, हत्यार, दिल है तुम्हारा, मुझसे दोस्ती करोगे, पिताह, देश देवी तेरे नाम, प्राण जाये पर शान ना जाये, सत्य बोल, रक्त, विरुद्ध, कुछ मिठा हो जाये, पोलीस, शो बीज, आपका सुरूर, गुरु, समर २००७, वूड स्टॉक वीला यासारख्या असंख्य चित्रपटात त्यांनी काम केलेले आहे.
5 / 12
मराठी, हिंदी, तामिळ चित्रपटातील त्यांच्या भूमिका या लोकप्रिय ठरल्या आहेत. सिंघम चित्रपटात साकारलेला गोट्या हा प्रेक्षकांच्या अजूनही लक्षात आहे. सचिन खेडेकर यांच्याकडे आगामी काळात आणखी काही चित्रपट असल्याचे सांगण्यात येते.
6 / 12
सचिन खेडेकर यांनी १९९३ साली जल्पा यांच्यासोबत लग्न केले आहे.
7 / 12
जल्पा या कलाविश्वापासून लांब असून त्या अनेक वेळा सचिन खेडेकर यांना मदत देखील करत असतात.
8 / 12
जल्पा या एक स्वतंत्र व्यावसायिक आहेत. जलपा या एका मोठ्या फिजिओथेरपिस्ट असून त्यांची स्वतःची अशी एक वेगळी ओळख आहे.
9 / 12
सचिन खेडेकर व जल्पा यांना दोन मुलं असून त्या मुलांची नावे सोहम आणि अर्चित अशी आहेत.
10 / 12
सचिन खेडेकर यांचा मोठा मुलगा सोहम हा कॅलिफोर्निया येथे राहतो. कॅलिफोर्निया येथे त्याने एका मोठ्या विद्यापीठातून संगणक शास्त्रामध्ये शिक्षण घेतलं आहे. सोहम हा सध्या मेटा या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करत आहे. तर सचिन खेडेकर यांचा लहान मुलगा अर्चित हा सध्या शिक्षण घेत आहे.
11 / 12
सचिन खेडेकर यांनी जीवा सखा या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. अस्तित्व, इम्तिहान आणि द बॉस द फर्गटन हिरो यासारख्या चित्रपटात त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. काकस्पर्श, कोकणस्थ, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय यासारख्या चित्रपटातील त्यांच्या भूमिका या प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या.
12 / 12
मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे अभिनेते म्हणून सचिन खेडेकर यांची एक वेगळी ओळख आहे. चिमणी पाखरं, फक्त लढ म्हणा, शिक्षणाच्या आईचा घो, आजचा दिवस माझा यासारख्या चित्रपटातूनही त्यांनी अफलातून अशा भूमिका केल्या.
टॅग्स :सचिन खेडेकर