Sachin Tendulkar: 'सचिन पिळगांवकर हे कला क्षेत्रातील सचिन तेंडुलकर' By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 1:42 PM1 / 10मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार, चतुरस्त्र अभिनेते सचिन पिळगावकर यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 2 / 10बालदिनाचे औचित्य साधून हा पुरस्कार सोहळा १४ नोव्हेंबर २०२२ रोजी गडकरी रंगायतन येथे सकाळी ११ वा. आयोजित करण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले यांनी मंगळवारी गडकरी रंगायतन येथे दिली. 3 / 10गंधार या बालनाट्य संस्थेच्यावतीने गंधार गौरव सोहळ्याचे दरवर्षी आयोजन केले जाते. यंदाचे हे सातवे वर्षे आहे. ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी, विद्या पटवर्धन, दिलीप प्रभावळकर, अशोक समेळ, नरेंद्र आंगणे, अतुल परचुरे यांना आतापर्यंत गंधार गौरव सोहळ्याने सन्मानित करण्यात आले आहे. 4 / 10यंदाचा हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते पिळगावकर यांना देण्यात येत आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष, आमदार आशिष शेलार आणि ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते पिळगावकर यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. 5 / 10मे महिन्यात गंधारतर्फे विविध जिल्ह्यांत गंधार गौरव बालनाट्य स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेसाठी ठाणे, मुंबई, नवी मुंबई, नाशिक, औरंगाबाद येथून प्रवेश आले होते. 6 / 10या स्पर्धेसाठी गोखले आणि अभिनेत्री हेमांगी वेल्हणकर यांनी परीक्षण केले. या स्पर्धेतील नामांकने देखील आज जाहीर करण्यात आली. या पत्रकार परिषदेला गंधारचे प्रा. मंदार टिल्लू, सुनील जोशी, अमोल आपटे, बाळकृष्ण ओडेकर आदी उपस्थित होते. 7 / 10कलेच्या उद्यानात मुक्त विहार करणारे कलानंदी व्यक्तिमत्त्व म्हणजे पिळगावकर त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. त्यांच्यात कलेचा आनंद घेण्याची वृत्ती आहे, असे विजय गोखले यांनी म्हटले. 8 / 10सचिन पिळगांवकर हे कला क्षेत्रातील सचिन तेंडुलकर असल्याचे कौतुकोदगार विजय गोखले यांनी काढले. त्यानिमित्ताने अनेकांना पिळगावकर आणि तेंडुलकर यांच्या मैत्रीचीही आठवण झाली. सचिन पिळगांवकर यांच्या जीवनावरील पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमास सचिने हजेरी लावली होती. 9 / 10सचिन पिळगांवकर यांना त्यांच्या सचिन नावाने ओळखले जाते, ते भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेता, दिग्दर्शक, गायक आणि निर्माता आहेत. १९६२ सालच्या “हा माझा मार्ग एकला” या मराठी चित्रपटाद्वारे वयाच्या चौथ्या वर्षी त्याचे चित्रपटक्षेत्रात पदार्पण झाले. ते एक उत्तम अभिनेते आहेत.10 / 10सचिन यांनी हिंदी, मराठी आणि भोजपुरी सिनेमातही चांगले काम केले. तू तू मैं मैं (२०००) आणि कड़वी खट्टी मेथी यासारख्या भारतीय टेलिव्हिजनवर यशस्वी, विनोदी कार्यक्रमांची निर्मिती, दिग्दर्शन म्हणून काम केले आहे. अशी ही बनवाबनवी हा त्यांचा चित्रपट सचिन तेंडुलकर यांनाही खूप आवडला होता आणखी वाचा Subscribe to Notifications