Sai tamhankar : सई ताम्हणकरने केसांत माळलेला गजरा अन् चाहत्याचा भलताच प्रश्न...!! By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2023 6:20 PM1 / 8मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर हिची बातच न्यारी. सईचे फोटो पाहून चाहत्यांना अगदी वेड लागतं.2 / 8सई सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. स्वत:चे रोज नवे फोटो ती शेअर करत असते. सध्याही तेच.3 / 8होय, सईने नुकतंच एक फोटोशूट केलं. याचे काही फोटो तिने शेअर केले आहेत आणि हे फोटो पाहून चाहते क्रेझी झाले आहेत.4 / 8नाकात नथ, हातात हिरवा चुडा, लान किनारीची निळी जांभळी साडी आणि त्याला साजेसा मेकअप असा तिचा लुक आहे. पण केसात माळलेला सुंदर मोगऱ्याच्या फुलांचा गजरा म्हणजे खल्लास करणारं प्रकरण आहे.5 / 8होय, सईने केसांत माळलेल्या या गजऱ्याने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोंवरच्या कमेंट्सही भन्नाट आहेत.6 / 8सईच्या केसातील गजरा पाहून एका चाहत्याला भलताच प्रश्न पडला आहे. गजरा मस्त आहे कितीला भेटला, असं त्याने विचारलं.7 / 8 यार, पाहताच ती बाला कलीजा खलास झाला..., लईच गोड अशी कमेंट अन्य एका चाहत्याने केली. किती गोड दिसताय सईबाई, अशी कमेंटही एका चाहत्याने केली आहे.8 / 8सई ताम्हणकर आजची मराठीमधील टॉपची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सईने तिच्या अभिनय कौशल्याच्या जोरावर स्वतःला कलाक्षेत्रामध्ये सिद्ध केलं. आणखी वाचा Subscribe to Notifications