Join us  

रिंकूचा कधीही न पाहिलेला बोल्ड फोटो व्हायरल; दिसतोय कमालीचा फिटनेस! पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 10:09 AM

1 / 11
अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'सैराट' (Sairat) या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून ती रातोरात सुपरस्टार झाली.
2 / 11
वयाच्या 16 व्या वर्षीच रिंकूचा पहिलाच चित्रपट 'सैराट' भारतीय सिनेसृष्टीत ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटाने तिने साकारलेली 'आर्ची' (अर्चना पाटील) ही भूमिका चांगलीच गाजली. तिच्या या भूमिकेचं आजही कौतुक होतं.
3 / 11
या चित्रपटानंतर 16 वर्षांच्या आर्चीने आपल्या लूक्सवर आणि फिटनेसवर खूप मेहनत घेतली आहे.
4 / 11
रिंकू राजगुरूने आपल्या स्टाईल आणि फॅशनमध्ये बदल केले. तिचा हा बदल चाहत्यांनाही पसंत पडला.
5 / 11
रिंकू सध्या वर्कआऊटचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
6 / 11
रिंकू राजगुरू सोशल मीडियावर विशेष सक्रिय आहे. अलीकडेच तिने शेअर केलेल्या एका पोस्टने लक्ष वेधून घेतले.
7 / 11
तिने एक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत चाहत्यांनाच धक्काच दिलाय. कायम पारंपारीक लूक करणाऱ्या रिंकूचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला.
8 / 11
रिंकूने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक मिरर सेल्फी शेअर केला आहे. ज्याला तिने यानिझा या गायिकेचे फ्लाय अवे (फ्री बर्ड) हे गाणेही जोडलं आहे. या फोटोमध्ये रिंकू तिचा फिटनेस फ्लाँट करतेय. तिचा हा फोटो सध्या चर्चेत आला आहे.
9 / 11
याआधी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात रिंकूचा बोल्ड लूक पाहायला मिळाला होता.
10 / 11
रिंकू तिच्या सोशल मीडियावर जास्त बोल्ड फोटो शेअर करत नाही. ती कायम साडी, किंवा कुर्तीमध्ये पाहायला मिळते. पण, आताचा तिचा हा लूक चाहत्यांच्या पसंत पडला आहे.
11 / 11
आता आगामी काळात ती कोणत्या हिंदी किंवा मराठी किंवा इतर भाषेतील प्रोजेक्टमध्ये दिसेल, याबद्दल चाहते उत्सुक आहेत.
टॅग्स :रिंकू राजगुरूमराठी अभिनेतासेलिब्रिटी