"मैं तेरी परछाई हूँ", आई शुभांगीबरोबर सखीचं फोटोशूट; पाहा मायलेकींचे खास फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 11:57 AM1 / 9शुभांगी गोखले आणि सखी गोखले ही मराठी सिनेसृष्टीतील मायलेकीची लोकप्रिय जोडी आहे. सखी ही शुभांगी गोखले आणि दिवंगत अभिनेता मोहन गोखले यांची मुलगी आहे. 2 / 9आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सखीने अभिनयाची वाट धरली. 'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या सखीने सिनेमांमध्येही काम केलं आहे. 3 / 9नुकतंच या मायलेकीने फोटोशूट केलं आहे. यामध्ये शुभांगी गोखले आणि सखीने साडी नेसून दमदार लूक केला आहे. 4 / 9शुभांगी गोखले यांनी लाल रंगाच्या साडीत नेसली आहे. 5 / 9अगदी साधा मेकअप आणि सिल्व्हर ज्वेलरीमध्ये त्यांचं सौंदर्य खुलून आलेलं दिसत आहे. 6 / 9तर सखीने मस्टर्ड कलरची साडी नेसून केस मोकळे सोडत अत्यंत साधा लूक केला आहे. 7 / 9फोटोशूटसाठी मायलेकींनी खास पोझही दिल्या आहेत. 8 / 9सखी गोखले आणि शुभांगी गोखले यांचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. 9 / 9या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications