Photos : श्रिया पिळगावकरनं घेतला Sky Diving चा थरारक अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 14:04 IST
1 / 10सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची लेक आणि अभिनेत्री श्रिया पिळगावकर ही कायम चर्चेत असते. 2 / 10श्रिया ही खऱ्या आयुष्यात अत्यंत बोल्ड आणि बिनधास्त आहे. 3 / 10श्रियाला फिरण्याची फार आवड असून ती जगण्याचा मनमुराद आनंद घेते. आता पुन्हा एकदा याचा प्रत्यत आला आहे. 4 / 10श्रियाने तब्बल 18,000 फुटांवरून उडी मारली आणि स्काय डायव्हिंगचा थरारक अनुभव घेतला. 5 / 10नुकतंच श्रिया ही न्यूझीलंडमध्ये पोहचली होती. येथेच तिने हे स्काय डायव्हिंग केलं. याचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केलेत. 6 / 10विशेष म्हणजे स्काय डायव्हिंग करण्याची श्रियाची ही पहिली नाही तर दुसरी वेळ आहे. याआधीही तिने हा थरारक अनुभ घेतलेला आहे. 7 / 10या फोटोंमध्ये श्रिया ही जमिनीपासून कित्येक मीटर उंचीवर तरंगताना दिसून येतेय. 8 / 10आकाशात उंच उडायला कुणाला आवडणार नाही. विमानाने आपण आकाशात पोहोचतो खरं पण पक्ष्यासारखं उडावं असंही आपल्याला वाटतं. यासाठी स्काय डायव्हिंग केलं जातं.9 / 10स्काय डायव्हिंगमध्ये लोक हजारो फूट उंचीवरून पॅराशूटने उडी मारतात.10 / 10 हवेत काही सेकंद फ्री फॉल मिळतात. तितक्यात ते खाली उतरणार असताना तो पॅराशूट उघडतो. आणि सहज जमिनीवर सुरक्षित लँडिंग करतो. स्कायडायव्हिंग हा साहसप्रेमींसाठी आवडता अनुभव आहे.